Maharashtra Weather Forecast: राज्यात पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज; 'या' जिल्ह्यांना अलर्ट
कृष्ण जन्माष्टमीपासून सलग तीन दिवस राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली होती. आता पुन्हा एकदा राज्यात पाऊस सक्रिय होणार आहे.
ऑगस्ट महिन्यात दडी मारलेल्या पावसाने काही दिवसापुर्वी पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या 3 दिवसांपासून पुन्हा पावसाने दडी मारल्यानंतर आता पाऊस पुन्हा हजेरी लावणार आहे. हवामान विभागाने या पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. आजपासून पुढील दोन ते तीन दिवस राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरावर कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यापार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. (हेही वाचा - Aaditya Thackeray: आदित्य ठाकरे दुष्काळभागाची आज करणार पाहणी, छत्रपती संभाजीनगर नंतर नाशिक दौऱ्यावर)
कृष्ण जन्माष्टमीपासून सलग तीन दिवस राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली होती. आता पुन्हा एकदा राज्यात पाऊस सक्रिय होणार असून आजपासून पुढील तीन दिवस मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मराठवाड्यातील नांदेड, परभणी, औरंगाबाद, जालना या 4 जिल्ह्यांना यलो अलर्ट आहे. या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, बुलडाणा, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे.
(The above story first appeared on LatestLY on Sep 15, 2023 09:06 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

