आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघातून विजयी; सुरेश माने यांच्यावर केली मात
आदित्यच्या विरोधात सुरेश माने, अभिजीत बिचुकले यांचे आव्हान होते.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये वरळी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) विजयी ठरले आहेत. आदित्य ठाकरेंच्या माध्यामातून निवडणूक लढवणारा तो पहिला ठाकरे ठरला आहे. 2019 च्या विधानसभा निवडणूकीत त्याने शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणार्या वरळीमध्ये आपला विजयी पताका फडकावला आहे. आदित्य ठाकरे यांच्या विरूद्ध निवडणूकीच्या रिंगणात बिग बॉस मराठी 2 फेम अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukale) होते. मात्र आदित्य यांनी या विधानसभा मतदार संघात दणदणीत विजय मिळवला आहे. राज ठाकरे यांनी मनसेकडून उमेदवार दिलेला नाही. भाजपला धक्का: काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीच्या पाठिंब्यावर महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकतो.
वरळी विधानसभा मतदार संघामध्ये शिवसेनेला आव्हान असलेले राष्ट्रवादीचे सचिन अहिर यांनी देखील निवडणूकीपूर्वी शिवसेनेत दाखल झाले आहेत. त्यामुळे आदित्यसाठी मार्ग मोकळा आहे.'जनआशीर्वाद यात्रेदरम्यान मी महाराष्ट्र पालथा घातला, राज्याला जाणून घेतले. ही यात्रा म्हणजे आजच्या निर्णयाची मोठी तयारी होती. मला नवा महाराष्ट्र घडवायचा आहे. मला जनतेची स्वप्ने साकार करायची आहेत, लोकांच्या न्याय हक्कांसाठी मला लढायचे आहे म्हणून मी हा निर्णय घेतला.’असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रात आज 288 विधानसभा निवडणूकांचे निकाल हाती येणार आहेत. यंदा राज्यात 60% मतदान पार पडले आहे. 21 ऑक्टोबरला मतदान पार पडलं तर 24 ऑक्टोबरला विधानसभा निवडणूक निकाल लागणार आहे. मागील विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबर पर्यंत आहे.