Coronavirus: महाराष्ट्रातून गेलेल्या प्रवाशाचा श्रीनगर मध्ये COVID19 मुळे मृत्यू
त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन वारंवार केले जात आहे. अशातच कोरोनाच्या चाचण्यांची सुद्धा संख्या वाढवण्यावर भर दिला जात आहे.
देशासह राज्यात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा दिवसागणिक वेगाने वाढत चालला आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन वारंवार केले जात आहे. अशातच कोरोनाच्या चाचण्यांची सुद्धा संख्या वाढवण्यावर भर दिला जात आहे. याच पार्श्वभुमीवर महाराष्ट्रातील 70 वर्षीय प्रवाशाचा बुधवारी कोविड19 मुळे मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे.(Coronavirus In India: केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले देशातील कोरोना व्हायरस रुग्ण वाढीचे कारण)
समोर आलेल्या रिपोटनुसार, पुण्यातील प्रवासी व्यक्ती हा श्रीनगर मधील छातीच्या आजासंबंधित एका रुग्णालयात 30 मार्चला उपचारासाठी दाखल झाला. मात्र विशेष उपचारासाठी त्याला नंतर शहरातील एसएमएचएस रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी त्यामध्ये श्वास घेण्यास समस्या आणि कोरोनाची सौम्य लक्षण दिसून आली. मात्र कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याचा आज मृत्यू झाल्याचे रुग्णालयाच्या डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. तर श्रीनगरला सदर व्यक्ती त्याच्या मुलासोबत आला होता. मात्र विमानतळावर या दोघांची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली होती. सध्या मुलावर उपचार केले जात आहेत.
तर टेस्ट, ट्रॅकींग आणि ट्रीय या तिन्ही गोष्टी कोरोना नियंत्रणासाठी अनिवार्य आहे. ट्रॅकींगनंतर आयसोलेशन आणि ट्रीटमेंट आवश्यक आहे. कोरोना विरुद्ध तयारीबाबत बोलताना हर्षवर्धन यांनी सांगितले की, 20 लाख बेड देशात तयार आहेत. भारत सरकार सर्व प्रकरणे गांभीर्याने पाहात आहे. गेल्या आठवड्यात 47 जिल्ह्यांसोबत एक बैठक झाली. आज सकाळी 430 जिल्ह्यांमध्ये या जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी गेल्या 28 दिसांमध्ये एकही कोरोनाचा रुग्ण सापडत नाही.(Coronavirus: कोरोनाच्या वाढत्या घटनांमध्ये जनतेचा निष्काळजीपणा; देशात तब्बल 50 टक्क्यांहून अधिक लोक घालत नाहीत मास्क- Government Survey)
दरम्यान, भारतात कोरोनाचे आणखी 53,480 रुग्ण आढळले असून 41280 जणांना डिस्चार्ज दिला गेला आहे. तर गेल्या 24 तासात 354 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशात कोरोनाचे एकूण 1,21,49,335 रुग्ण, 1,14,34,301 जणांनी कोोरनावर मात केली आहे. तर 5,52,556 अॅक्टिव रुग्णसंख्या असून एकूण 1,61,468 जणांना बळी गेला आहे. त्याचसोबत 6,30,54,353 लसीकरण झाल्याची माहिती आरोग्यमंत्रालयाकडून दिली गेली आहे.