IPL Auction 2025 Live

सोलापूर: रंगपंचमीला रंग खेळू न दिल्याने 14 वर्षाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

रंग खेळू न दिल्याने एका 14 वर्षीय मुलाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Image used for representational purpose only (Photo Credits: PTI)

रंगपंचमीला रंग खेळू न दिल्याने एका 14 वर्षीय मुलाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यश दशरथ जाधव असे या आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नाव असून तो आठवीत शिकत होता. सोलापूरातील माढा तालुक्यातील जाधववाडी येथे तो त्याच्या कुंटुंबासह राहत होता. SSC परीक्षेचा अभ्यास पूर्ण झाला नाही, विद्यार्थिनीची गळफास लावून आत्महत्या

यशचे वडील दशरथ हे ऑडिटरचे काम करतात. मात्र सोमवारी (25 मार्च) सुट्टी असल्याने ते लहान मुलगा ओमसह शेळ्या चारण्यास गेले होते. यशला रंग खेळण्यास मनाई केल्याने तो घरी अभ्यास करत होता. परंतु, दुपारी पाचच्या दरम्यान यश राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या करत असल्याचे काका बाळू जाधव यांनी पाहिले. त्यानंतर त्याला तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. PUBG च्या नादामुळे 19 वर्षीय तरुणाची आत्महत्या

आजकाल शुल्लक कारणांवरुन आत्महत्या करण्याचे प्रमाण मुलांमध्ये वाढलेले दिसून येते. गेम खेळू न दिल्याने, अभ्यास करायला सांगितल्याने, मोबाईल देण्यास नकार दिल्याने अशा लहान सहान गोष्टींवरुन आत्महत्या करणाऱ्या मुलांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.