Maharashtra Sadan Scam: Anjali Damania यांची Chhagan Bhujbal यांना मिळालेल्या क्लिन चीटच्या निर्णयाविरूद्ध Mumbai High Court मध्ये याचिका

महाराष्ट्र सदन व इंडिया बुल्स प्रकरणात राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 11 जून 2015 साली गुन्हे दाखल केल्यानंतर 15 जूनला ईडीनेही भुजबळांविरोधात काळा पैसा प्रतिबंधक कायदान्वये गुन्हे दाखल केले होते.

अंजली दमानिया । File Photos

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी एनसीपी नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि त्यांच्या पुतण्याला मुंबई सत्र न्यायालयाने काही दिवसांपूर्वी निर्दोष मुक्त केले आहे. पण आता या निर्णया विरोधात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया कोर्टात पोहचल्या आहे. त्यांनी सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात (Mumbai High Court) आपली याचिका दाखल केली आहे.

महाराष्ट्र सदन कथित घोटाळा प्रकरणी सप्टेंबर 2021 मध्ये छगन भुजबळांना क्लिन चीट मिळाली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी) न्यायालयाकडे दोषमुक्त करण्यासाठी छगन भुजबळ, त्यांचा पुतण्या समीर भुजबळ यांनी अर्ज दाखल केला होता. त्यावर कोर्टाने त्यांना क्लिन चीट दिली. मात्र आज अंजली दमानिया यांनी ट्वीट करत आपण या क्लिन चीट प्रकरणी उच्च न्यायलयात याचिका दाखल केल्याचं म्हटलं आहे. हे देखील नक्की वाचा: Maharashtra Sadan Scam: 'ज्यांना कोर्टात जायचं त्यांनी खुशाल जावं'; मुंबई सत्र न्यायालयाने छगन भुजबळांना दोषमुक्त केल्यानंतर अंजली दमानियांच्या हायकोर्टात जाण्याच्या तयारीवर प्रत्युत्तर.

अंजली दमानिया ट्वीट

छगन भुजबळ हे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना विविध कंत्राटातून भुजबळ कुटुंबीयांच्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात रोख रक्कम लाचेच्या स्वरुपाचा मिळाल्याचा आरोप त्यांच्यावर होता. महाराष्ट्र सदन व इंडिया बुल्स प्रकरणात राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 11 जून 2015 साली गुन्हे दाखल केल्यानंतर 15 जूनला ईडीनेही भुजबळांविरोधात काळा पैसा प्रतिबंधक कायदान्वये गुन्हे दाखल केले होते. दिल्लीत महाराष्ट्र सदन प्रकरणात छगन भुजबळ यांनी विविध कंपन्यांच्या माध्यमातून 13.5 कोटींची लाच घेतल्याचा आरोप लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या आरोपपत्रात करण्यात आला होता. या प्रकरणामध्ये 2 वर्ष भुजबळ तुरूंगात होते.