Maharashtra Rain Alert: मुसळधार पावसाची टांगती तलवार कायम; रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर जिल्ह्यांना यलो अलर्ट

हा अलर्ट 30 जुलै अखेरे काय असणार आहे. म्हणजेच पुढचे चार दिवस हे जिल्हे आणि उर्वरीत महाराष्ट्रासाठीही अत्यंत महत्त्वाचे असतील.

MaharashtraRain | (Photo Credit: Twitter)

महाराष्ट्रात दोनच दिवसांपूर्वी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे ( Maharashtra Rain Alert) अनेक जिल्ह्यांमध्ये दाणादाण उडवून दिली. प्रामुख्याने कोल्हापूर, रायगड (Raigad), सातारा, संगली आणि रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर महापूर, दरड कोसळणे आदी घटना घडल्या. यात काहीचे प्राण गेले, संसार उद्ध्वस्त झाले. काही जखमी झाले. वित्तहानीची तर गणतीच नाही. अशा स्थितीतून महाराष्ट्र अद्याप सावरतो आहे. दुर्घटना घडलेल्या ठिकाणी मदत आणि पूनर्वसन अध्यापही सुरुच आहे. तोवर पुन्हा एकदा मुसळधार पावसाची टांगती तलवार कायम असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाने रायगड, रत्नागिरी, पुणे (Pune), कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांना यलो अलर्ट ( Yellow Alert) देण्यात आला आहे. हा अलर्ट 30 जुलै अखेरे काय असणार आहे. म्हणजेच पुढचे चार दिवस हे जिल्हे आणि उर्वरीत महाराष्ट्रासाठीही अत्यंत महत्त्वाचे असतील.

अलर्टचा नेमका अर्थ काय?

ग्रीन अलर्ट: जेव्हा ग्रीन अलर्ट दिला जातो. त्याचा अर्थ असा की, कोणतंही संकट नाही, सर्व काही ठीक आहे.

यलो अलर्ट: एक प्रकारे धोक्याची पूर्वसूचना. वातावरण बदल मोठ्या प्रमाणावर अपेक्षीत. संकटही ओढावण्याची शक्यता. त्यामुळे सावधगिरी बाळगून कामास प्राधान्य द्या.

ऑरेंज अलर्ट: वातावरणात वेगाने बदल होतो आहे. कोणत्याही क्षणी आपत्ती, आपत्तीजनक संकट ओढावू शकते. नागरिकांनी सतर्क राहावे. वीजपुरवठा, वाहतूक ठप्प होऊ शकतो. महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा. अन्यथा घरीच थांबण्यास प्राधान्य द्या.

रेड अलर्ट: नैसर्गिक आपत्ती ओढावली आहे. नागरिकांनी स्वत:च्या सुरक्षेची काळजी घ्या. स्वरक्षीत ठिकाणी थांबा. धोकादायक भागात राहू नका. घराबाहेर पडणे शक्यतो टाळाच. प्रशासनास सहकार्य करता. संपर्कात राहा. (हेही वाचा, Maharashtra Floods: महाराष्ट्रात पावसाचा कहर; राज्यात भूस्खलन आणि पूरामुळे आतापर्यंत 164 जणांचा मृत्यू, 100 बेपत्ता)

दरम्यान, हवामान विभागाने मुसळधार पवसाची शक्यता वर्तवत पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, ठाणे या जिल्ह्यांसाठी आज (27 जुलै) आणि उद्या (28 जुलै) यलो अलर्ट जारी केला आहे.त्यामुळे पुढचे 48 तास अत्यंत महत्त्वाचे आहेत. 29 आणि 30 जुलै या दिवशी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.