Maharashtra Police Bharti 2021: पोलीस भरतीसंदर्भात गृहमंत्रालयाकडून GR जारी; SEBC आरक्षण न ठेवता भरती प्रक्रिया पार पाडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय

SEBC आरक्षण न ठेवता भरती प्रक्रिया पार पाडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय एसईबीसीतून अर्ज केलेल्या उमेदवारांची पात्रता ठरविताना खुल्या प्रवर्गाची वयोमर्यादा लागू केली जाणार आहे.

Maharashtra Police Bharti 2021: पोलीस भरतीसंदर्भात गृहमंत्रालयाकडून GR जारी; SEBC आरक्षण न ठेवता भरती प्रक्रिया पार पाडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय
Maharashtra Police | (PTI photo)

Maharashtra Police Bharti 2021: पोलीस भरतीसंदर्भात गृहमंत्रालयाकडून GR जारी करण्यात आला आहे. त्यानुसार, SEBC आरक्षण न ठेवता भरती प्रक्रिया पार पाडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय एसईबीसीतून अर्ज केलेल्या उमेदवारांची पात्रता ठरविताना खुल्या प्रवर्गाची वयोमर्यादा लागू केली जाणार आहे. तसेच जे उमेदवार खुल्या प्रवर्गातील अटी आणि शर्तींची पूर्तता करतात, त्यांचा खुल्या प्रवर्गातून विचार करण्यात येणार आहे.

दरम्यान, SEBC प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांकडून खुल्या प्रवर्गाचे परीक्षा शुल्क आकारले जाणार आहे. तसेच या उमेदवारांना वाढीव परीक्षा शुल्क ऑनलाईन भरण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. मात्र, उमेदवाराला ही संपूर्ण प्रक्रिया 15 दिवसांत पूर्ण करावी लागणार आहे. (वाचा- Cow Science Exam 2021: राष्ट्रीय कामधेनु आयोगाकडून 25 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय पातळीवर ऑनलाईन 'कामधेनु गौ विज्ञान प्रचार प्रसार परीक्षे'चे आयोजन)

 

गृहमंत्रालयाकडून काढण्यात आलेल्या जीआरची तात्काळ अंमलबजावणी करुन शासनाला अहवाल सादर करण्याच्या सूचना पोलिस महासंचालकांनी दिल्या आहेत. 2019 मध्ये गृहमंत्रालयाने महाराष्ट्र पोलिस भरती जाहीर केली होती. त्यानंतर यासंदर्भातील जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली होती. परंतु, 9 सप्टेंबर 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयाने SEBC आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्याने पोलिस भरती प्रक्रिया रखडली होती. मात्र, आता पोलिस भरतीचा मार्ग मोकळा झाला असून पोलिस भरतीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jan 06, 2021 01:44 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).