Maharashtra Police Bharti 2019: महाराष्ट्र राज्यभर पोलिस शिपाई भरती 2019 ला आजपासून सुरूवात; mahapariksha.gov.in वर करा अर्ज
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये रिक्त पद भरण्यासाठी पोलिस शिपाईंची भरती होणार आहे. यंदा पहिल्यांदाच ही परीक्षा महापोर्टलद्वारा घेतली जाणार आहे.
गृह विभागाने पोलीस भरतीच्या प्रक्रियेमध्ये मोठे बदल केल्यानंतर राज्यातील पोलिस भरती ( Police Bharti )प्रक्रियेची अनेकांना अपेक्षा होती. गृहाविभागाने नुकत्याच जाहीर केलेल्या माहितीनुसार आता राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये रिक्त पद भरण्यासाठी पोलिस शिपाईंची भरती होणार आहे. यंदा पहिल्यांदाच ही परीक्षा महापोर्टलद्वारा घेतली जाणार आहे. त्यासाठी महिला आणि पुरूष उमेदवारांना लेखी परीक्षा आणि शारिरीक चाचणी द्यावी लागणार आहे. त्यामुळे पहिल्यांदा लेखी आणि त्यानंतर शारिरीक चाचणी दिल्यानंतर यशस्वी उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. लेखी परीक्षेत उत्तीर्ण होणार्यांनाच शारीरीक चाचणी देता येणार आहे. ई महापरीक्षा पोर्टलद्वारा (mahapariksha.gov.in) उमेदवारांना 3-23 सप्टेंबर दरम्यान या पोलीस भरतीमध्ये अर्ज करता येणार आहे.
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती 2019
विभागाचे नाव - पोलीस विभाग
पद - पोलीस शिपाई
वेतनश्रेणी - 5200 ते 20200 रु. (ग्रेड पे – 2000 रु.) सोबत विशेष वेतन 500 रु. व इतर
शैक्षणिक पात्रता - 12 वी पास
कुठे कराल अर्ज - mahapariksha.gov.in
वयाची अट - खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयाची अट 18 ते 28 तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयाची अट 18 ते 33 वर्षापर्यंत आहे. येथे पहा सविस्तर जाहिरात
लेखी परीक्षा
अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुद्धीमत्ता चाचणी, मराठी व्याकरण या विषयांची 100 गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेमध्ये पास होणार्या उमेदवारांना शारिरीक चाचणी देता येणार आहे.
शारिरीक चाचणी
महिला आणि पुरूष उमेदवारांना शारिरिक चाचणी देण्यासाठी वेगवेगळे निकष जाहीर करण्यात आले आहेत. ही प्र्त्येकी 50 गुणांची परीक्षा असेल.
पुरूषांसाठी 1600 मीटर धावणे, 100 मीटर धावणे आणि गोळाफेक तर महिलांसाठी 800 मीटर धावणे, 100 मीटर धावणे,गोळाफेक (4 किलो) या निकषांवर निकाल लावले जाणार आहेत. Maharashtra Police Bharti 2019: महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती साठी mahapariksha.gov.in वर 23 सप्टेंबर पर्यंत करता येणार अर्ज; पहा उमेदवारांना कोणकोणती कागदपत्र आवश्यक?
इच्छुक उमेदवारांसाठी 3 सपटेंबरला संध्याकाळपासून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. महाराष्ट्रभर ही भरती होणार असल्याने पोलीस सेवेमध्ये जाण्यासाठी अनेक इच्छुक या परिक्षेसाठी वाट पाहत होते.