पालघर: मुलाकडून आईची हत्या; कारण कळताच बसेल धक्का!

ही घटना महाराष्ट्रातील पालघर (Palghar) जिल्ह्यात घडली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा नोंदवला आहे.

Murder | File Image

एका मुलाकडूनच आपल्या आईची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर येताच सर्वांना धक्का बसला आहे. ही घटना महाराष्ट्रातील पालघर (Palghar) जिल्ह्यात घडली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा नोंदवला आहे. आईच्या आजारपणाला वैतागून आरोपीने हत्या करण्याचा निर्णय घेतला. आरोपीच्या लहान भावाने जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोदवल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत. या घटनेमुळे आजूबाजुच्या परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

जयप्रकाश ढीबी असे आरोपीचे नाव असून तो आपली आई चंद्रावती आणि लहान भावासोबत पालघर जिल्ह्यातील तारापूर कस्बे भागात राहत होता. चंद्रावती ही गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असून तिच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु होते. चंद्रावती आजारपणे बरेच होत नसल्याने जयप्रकाश याने रविवारी तिच्या डोक्यावर लोखंडी दांड्याने हल्ला केला. यात तिचा मृत्यू झाला. परंतु, जयप्रकाश याचा लहान भाऊ याने जवळच्या पोलीस स्थानकात जाऊन सर्वप्रकार सांगितला त्यानंतर पुलीस निरीक्षक राकेश पगाडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून चंद्रावतीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवले आहे. हे देखील वाचा- नाशिक: आजारपणाला कंटाळून भाजप नगरसेविका शांता हिरे यांची विष प्राशान करून आत्महत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेच्या लहान मुलाच्या ग्वाहीच्या आधारावर आरोपीला अटक करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी चौकशीला सुरुवात केल्यानंतर आरोपीनी हत्या करण्या मागचे कारण कळाले. आपली आई गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होती. तिच्यावर उपचार करुनही तिला बरे वाटत नव्हते. याला वैतागून आरोपीने आपल्या आईची हत्या केल्याची कबूली दिली आहे.