Maharashtra Monsoon 2020 Updates: मुंबई, ठाणे, पालघर मध्ये 13,14 जून दिवशी मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज
मुंबई, ठाणे, पालघर मध्ये 13,14 जून दिवशी मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता असल्याचा हवामान खात्याने वर्तवला आहे.
जून महिना उजाडला की आपोआपच सार्यांना पावसाचे वेध लागायला सुरूवात होतात. यंदा मुंबईमध्ये मान्सून दाखल होण्याची सरासरी तारीख 11 जून आहे. सोबतच आता राज्यात मान्सून साक्रिय होण्यासाठी वातावरणदेखील पोषक आहे अशी माहिती भारतीय हवामान खात्याने दिल्यानंतर आता सार्यांनाच पावसाची उत्सुकता आहे. मुंबई, ठाणे, पालघर मध्ये 13,14 जून दिवशी मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता असल्याचा हवामान खात्याने वर्तवला असल्याचं वृत्त TOI ने दिले आहे. Monsoon 2020 in Konkan Updates: रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत्या 24 तासांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता; जाणून घ्या 10-15 जून दरम्यानचा हवामान अंदाज.
मुंबई शहर, उपनगर आणि आजूबाजुच्या परिसरात काल मध्यरात्रीपासूनच पावसाच्या हलक्या सरी बरसण्यास सुरूवात झाली आहे. आज सकाळपासूनच मुंबईमध्येही ढगाळ वातावरण आहे. हवामानखात्याच्या अंदाजानुसार आज (11 जून) शहराच्या काही भागामध्ये वीजांच्या कडकडाटासह जोरदार वारा राहणार आहे. अंदाजे 30-40 KMPH या वेगाने शहराच्या काही भागात वारा वाहू शकतो. दरम्यान मागील वर्षी हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजाच्या पुढे 2 आठवडे मान्सून लांबला होता. मागील वर्षी 25 जूनला मान्सूनने मुंबईमध्ये आपली हजेरी लावली होती.
दरम्यान हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार यावर्षी 1 जूनला केरळमध्ये मान्सून दाखल झाला आहे. दक्षिण भारताला व्यापल्यानंतर आता मान्सूनचा उत्तर दिशेला प्रवास सुरू झाला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तळकोकणातल्या भागातही आज वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाड्यातही उदया (12 जून) पासून पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jun 11, 2020 08:29 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

