Maharashtra: दोन दिवसात Remdesivir इंजेक्शन लोकांना न मिळाल्यास कोरोनाग्रस्तांसह मातोश्रीवर धडकणार असल्याचा सदाभाऊ खोत यांचा इशारा
त्याचसोबत कोरोनाग्रस्तांसाठी लागणाऱ्या रेमिडेसिव्हर इंजेक्शनचा तुटवडा सुद्धा काही ठिकाणी भासत आहे.
Maharashtra: राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्ये मुळे चिंता व्यक्त केली जात आहेच. त्याचसोबत कोरोनाग्रस्तांसाठी लागणाऱ्या रेमिडेसिव्हर इंजेक्शनचा तुटवडा सुद्धा काही ठिकाणी भासत आहे. याच पार्श्वभुमीवर दोन दिवसात रेमिडेसिव्हर इंजेक्शन नागरिकांसाठी उपलब्ध न झाल्यास थेट मातोश्रीवर कोरोनाग्रस्तांसह धडकणार असल्याचा इशारा आमदार सदाभाऊ खोत यांनी दिला आहे. तर राज्यात या इंजेक्शच्या तुटवड्यामुळे मृत्यूंच्या संख्येत अधिक वाढ असल्याने त्यासाठी ठाकरे सरकारच जबाबदार असल्याची टीका खोत यांनी केली आहे. त्यावेळी ते साताऱ्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत बोलत होते.
खोत यांनी पुढे असे म्हटले आहे की, ठाकरे सरकराकडून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबद्दल अधिक बोलले जात आहे. तसेच अन्य राज्यांनी रेमिडेसिव्हर इंजेक्शनचा साठा करुन ठेवला आहे. त्याचसोबत रेमिडेसिव्हर उपलब्ध असून ही ते औषध खात्याच्या माध्यमातून खरेदी करण्याची भुमिका राज्य सरकारने घेतली. मात्र हेच इंजेक्शन एखाद्या कंपनीने खासगी मेडिकलला दिले असता त्यांना धमकावण्यात आले. कंपनी सहाशे पंन्नास रुपयात इंजेक्शन मागत होते आणि दुकानदार ते बाराशे रुपयांना खरेदी करण्यासाठी सुद्धा तयार झाले होते. परंतु त्यांना खरेदी करण्यास स्पष्टपणे नकार दिला गेला.('पहिला प्रयोग तुझ्या घर कोंबडा मुख्यमंत्र्यावर कर', देवेंद्र फडणवीसांवर वादग्रस्त वक्तव्य करणा-या संजय गायकवाडांवर नितेश राणे यांची जहरी टीका)
दुसऱ्या बाजूला रेमिडेसिव्हर इंजेक्शनवरुन राजकरण तापल्याचे दिसून आले आहे. महाराष्ट्र सरकार मधील कॅबीनेट मंत्री नबाब मलिक यांनी केलेल्या विधानावरुन खळबळ उडाली आहे. ज्यामध्ये असा आरोप लावण्यात आला होता की, केंद्र सरकारकडून काही रेमिडेसिव्हर पुरवणाऱ्यांवर दबाब टाकला जात आहे की राज्यांना त्याचा पुरवठा करु नये. अशातच विरोधीपक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी महाराष्ट्र सरकारवर मोठा आरोप लावत असे म्हटले की, एका रेमिडेसिव्हर सप्लायरला यासाठी त्रास दिला जात आहे कारण तो काही भाजपच्या नेत्यांसोबत आहे.