Maharashtra: अंबरनाथ मधील निवृत्ती व्यक्तीकडून संपूर्ण पेन्शची रक्कम व्हेंटिलेटर्ससाठी दान
मोहन कुलकर्णी असे त्यांचे नाव आहे.
Maharashtra: अंबरनाथ मधील एका खासगी कंपनीतील 65 वर्षीय निवृत्त व्यक्तींकडून त्यांची पेन्शनची (Pension) संपूर्ण रक्कम व्हेंटिलेटर्ससाठी (Ventilators) दान केली जात आहे. मोहन कुलकर्णी असे त्यांचे नाव असून ते त्यांची 4 लाखांची पेन्शन आणि आणखी 2.5 लाखांचे कर्ज व्हेंटिलेटर्स खरेदी करण्यासाठी घेतले आहे. त्यामुळे एकूण 6.5 लाख रुपये कुलकर्णी यांनी अंबरनाथ मधील एका महापालिकेला व्हेंटिलेटर्स खरेदी करण्यासाठी दान केले आहेत.(Coronavirus: महाराष्ट्रात 'या' महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता, राजेश टोपे यांनी व्यक्त केली भिती)
दिवसागणिक कोरोनाच्या रुग्णांमध्ये तुफान वाढ होत आहे. त्यामुळे रुग्णांलयात व्हेंटिलेटर्सचा तुटवडा सध्या भासून येत आहे. अंबरनाथ मध्ये नुकताच कोरोनाग्रस्तांचा आकडा एका दिवसात 400 वर पोहचल्याचे दिसून आले होते. डॉ. प्रशांत रसल यांनी उद्योगपती आणि नागरिकांना रुग्णालयातील रुग्णांवर उपचार करण्यासाठी काही गोष्टींचा तुटवडा भासत असल्याने पुढे येऊन मदत करण्याचे अपील केले होते.
TOI सोबत बोलताना कुलकर्णी यांनी असे म्हटले की, प्रथम रुग्णवाहिका दान करण्याचा विचार केला होता. परंतु त्यांच्याकडे पुरेश्या रुग्णवाहिका असल्याचे कळले. मात्र जेव्हा महापालिकेला व्हेंटिलेटर्सची गरज असल्याचे कळते असता मी आणखी 2.5 लाखांचे कर्ज घेऊन ते खरेदी केले. त्यामुळे माझी मदत काही जणांचा जीव वाचवू शकेल अशी अपेक्षा आहे. जवळजवळ 850 महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आपला एक पगार 5 Bi-PAP मशीन खरेदी करण्यासाठी दान केला आहे.(Lockdown In Maharashtra: महाराष्ट्रात 15 मे पर्यंत लॉकडाऊन कायम, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय)
अंबरनाथ मध्ये राहणारे कुलकर्णी सध्या कांजुरमार्ग येथे राहतात. त्यांनी आपल्या बायकोला कॅन्सरमुळे गमावले होते. तर कुलकर्णी यांना महापालिकेच्या रुग्णालयाला काहीतरी दान करायचे होते आणि आता हिच योग्य वेळ साधून त्यांनी आपला व्हेंटिलेटर्स खरेदी करण्यासाठी हातभार लावला आहे.