Maharashtra: नाशिक येथील व्यक्तीने दारुच्या नशेत केली 60 वर्षीय आईची हत्या, पोलिसांकडून अटक
या प्रकरणी पंचवटी पोलिसांकडून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
Maharashtra: नाशिक येथे एका व्यक्तीने आपल्या 60 वर्षीय आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पंचवटी पोलिसांकडून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. तर आरोपीने आपला गुन्हा कबूल केला असून त्याने दारुच्या नशेत तिची हत्या केल्याचे म्हटले आहे. आरोपीचे नाव प्रशांत पवार असून तो पंचवटी येथे राहणार आहे.(Mumbai Online Fraud: मुंबईतील तिघांना ऑनलाइन दारू मागवण्याचा प्रयत्न फसला, अज्ञाताकडून 2 लाखांचा गंडा)
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, प्रशांत दारुच्या नशेत पहाटे 3 वाजता घरी आला होता. मुलाला अद्दल शिकवण्यासाठी आईने त्याचा हात पकडून त्याला इमारतीबाहेर टाकले. त्याचवेळी प्रशांत याने आईला पाठीमागे ढकले. त्यामुळे तिचे डोते भिंतीला आपटले गेले आणि रक्त येऊ लागले.
या प्रकारानंतर प्रशांत याने आईला घरी आणत बेडवर ठेवले. परंतु सकाळी पाहता तिचा मृत्यू झाला होता. डोक्यावर आपटल्याने खुप रक्त वाहून गेले होते. दरम्यान, प्रशांत याने पोलिसांना फोन करत घडलेल्या प्रकाराबद्दल सांगितले. पंचवटी पोलिसांनी प्रशांत याला अटक केली असून त्याच्यावर कलम 304 लागू केला आहे.(Mumbai Online Fraud: भारतीय बहुराष्ट्रीय कॉर्पोरेशनच्या प्रोजेक्टचा मॅनेजर असल्याचे भासवत मुंबईतील महिलेची 7.76 लाखांची फसवणूक, आरोपीचा तपास सुरू)
प्रशांत आणि त्याची आई असे दोघेच घरात राहत होते. आरोपी हा बेरोजगार असून त्याला दारु पिण्याची सवय होती. तर आईची पेन्शन हे एकमेव घरात पैसे येण्याचे साधन असल्याचे पोलिसांनी सांगितले.