Maharashtra: राज्यात दारुची दुकाने सुरु पण मंदिर बंद ठेवल्याने देवेंद्र फडणवीस आक्रमक, सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे पालन करुन सरकारने निर्णय घेण्याची मागणी

त्यांनी असे म्हटले की, राज्यात दारुची दुकाने सुरु केली पण मंदिरे का नाही?

Devendra Fadnavis (Photo Credit: Twitter)

Maharashtra: राज्यात आता कोरोनाचे निर्बंध शिथील करण्यात आले असून दुकाने, रेस्टॉरंट, मॉल्ससह अन्य काही गोष्टी सुरु करण्यास परवानगी राज्य सरकारने दिली आहे. मात्र अद्याप मंदिर आणि धार्मिक स्थळे ही राज्य सरकारच्या पुढील आदेशापर्यंत बंद ठेवली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अशातच आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे पुन्हा एकदा मंदिरे सुरु करण्यावरुन आक्रमक झाले आहेत. त्यांनी असे म्हटले की, राज्यात दारुची दुकाने सुरु केली पण मंदिरे का नाही? त्याचसोबत मंदिरापेक्षा अधिक गर्दी दारुच्या दुकानावर किंवा बारमध्ये दिसून येते असा निशाणा सुद्धा राज्य सरकारवर साधला आहे.(Delta Plus Variant Update: महाराष्ट्रात डेल्टा प्लसच्या रुग्णांमध्ये वाढ, राज्यात रुग्णांचा आकडा पोहोचला 76 वर)

फडणवीस यांनी पुढे असे ही म्हटले की, मंदिर पूजाऱ्यांपासून ते मंदिराबाहेर हार विक्री करणाऱ्यांचे यामुळे हाल होत आहेत. त्याचे आयुष्य हे मंदिरावर अवलंबून आहे. त्यांच्यासाठी तरी राज्य सरकारने मंदिर सुरु करावीत. मंदिर बंद ठेवणे ही सरकारचीच चुकी आहे. दारुची दुकाने ठेवणे आणि मंदिर का सुरु करत नाहीत असा सवाल देवेंद्र फडवणीस यांनी उपस्थितीत केला आहे.(Malls Shut Again: मुंबईसह आसपासच्या परिसरातील मॉल्स दोन दिवसातच बंद, जाणून घ्या यामागील कारण)

Tweet:

त्याचसोबत भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी सुद्धा मंदिर सुरु करण्याचा मुद्दा उचलून धरला आहे. त्यांनी औरंगाबाद मधील घृष्णेश्वर मंदिरासोबत आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे. त्याचसोबत पूर्णपणे लसीकरण झालेल्या नागरिकांना मंदिरात प्रवेश द्यावा असे ही भोसले यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता सरकारने मंदिर पुन्हा उघडण्यासंदर्भात सुद्धा निर्णय घ्यावा असे ही त्यांनी स्पष्ट केले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif