महाराष्ट्र: राज्यात Liquor दुकाने सुरु करण्यास परवानगी पण मंदिरे कधी सुरु करणार असा सवाल करत भाजप कडून महाविकास आघाडीच्या निर्णयाचा निषेध
महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा रुग्णांचा आकडा वाढत आहे. परंतु राज्याला आर्थिक चालना मिळावी यासाठी मिशन बिगिन अगेन नुसार टप्प्याटप्प्याने काही गोष्टी सुरु करण्यास राज्य सरकारने परवनगी दिली आहे. याच दरम्यान आता राज्य सरकारने नुकत्याच अनलॉक5 संदर्भात घोषणा करत त्या बद्दल मार्गदर्शक सुचना सुद्धा जाहीर केल्या. त्यानुसार राज्यात रेस्टॉरंट्स, बार आणि हॉटेल्स सुरु करण्यासाठी परवागनी दिली गेली आहे. मात्र लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून ते आतापर्यंत मंदिरे अद्याप सुरु करण्याबद्दल कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही. याच कारणास्तव आता भाविकांसह विरोधी पक्षांकडून मंदिरे सुरु करण्याची मागणी केली जात आहे. त्याचसोबत दारुची दुकाने सुरु करण्यास परवानगी मात्र मंदिरे सुरु न करण्याच्या महाविकास आघाडीच्या निर्णयाचा भाजप कडून निषेध करण्यात आला आहे.(Maratha reservation: मराठा समाजाचा केंद्र सरकारला इशारा; आरक्षण प्रश्नावर राज्यातील सर्व तहसील कार्यालयांसमोर धरणे आंदोलन)
राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता सरकारने लॉकडाऊनचे आदेश दिले होते. त्यावेळी फक्त अत्यावश्यक सेवासुविधांना परवानगी देण्यात आलेली होती. मात्र आता अनलॉक 5 नुसार गेल्या पाच महिन्यांपासून अधिक काळ बंद असलेले रेस्टॉरंट्स, बार आणि हॉटेल्स अटीशर्थींसह आजपासून 50 टक्के उपस्थितीत सुरु करण्यास परवानगी दिली आहे. तर दुसऱ्या बाजूला मंदिरे अजून ही सुरु न झाल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच मंदिर परसरातील उद्योजकांनी सुद्धा यावर वारंवार आपली खंत व्यक्त केल्याचे दिसून आले होते. त्यामुळेच आता राज्यात मंदिरे सुरु करण्यात यावी अशी मागणी जोर धरुन बसली आहे.(Unlock 5: महाराष्ट्रात आजपासून ग्राहकांसाठी खुली झाली हॉटेल्स, रेस्टॉरन्ट आणि बार; जाण्यापूर्वी सरकारच्या 'ह्या' महत्वाच्या नियमांची करा उजळणी)
दरम्यान, काही दिवसांवर नवरात्रौत्सव जवळ आला आहे. त्यामुळे आता तरी मंदिरे सुरु करण्याची परवानगी राज्य सरकारने द्यावी अशी मागणी केली जात आहे. त्याचसोबत मद्यालये सुरु केली असून देवलये का नाही उघडण्यास परवानगी असा प्रश्न उपस्थितीत करत भाजपसह विविध मंदिराच्या ट्रस्टच्या विश्वस्तांसह पुजाऱ्यांकडून उपस्थितीत केला जात आहे. तसेच मंदिरांसह ग्रंथालये सुद्धा सुरु करण्यात यावी असा तगादा वाचकांनी ही लावला आहे.