मुंबई: कपिल वाधवान, धीरज वाधवान यांना 29 एप्रिल पर्यंत CBI Custody!
दरम्यान 29 एप्रिलपर्यंत दोघेही सीबीआयच्या ताब्यात राहणार आहेत.
येस बॅंक आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अडचणीत आलेल्य वाधवान कुटुंबियांपैकी कपिल वाधवान आणि धीरज वाधवान यांना सीबीआयने ताब्यात घेतले आहे. दरम्यान 29 एप्रिलपर्यंत दोघेही सीबीआयच्या ताब्यात राहणार आहेत. महाबळेश्वर येथे त्यांचा क्वारंटीनचा काळ संपल्यानंतर तेथूनच त्याना सीबीआयने ताब्यात घेतले आहे. दरम्यान महाराष्ट्रात लॉकडाऊन असताना वाधवान कुटुंब खंडाळाहून महाबळेश्वरला दाखल झाल्याने प्रशासनासह पोलिस खात्यामध्ये गोंधळ उडाला होता. लॉक डाऊनमध्ये येस बँक घोटाळ्यातील वाधवान कुटुंबामधील 23 सदस्य महाबळेश्वरला; गृहमंत्रालयाच्या सचिवांनी दिले परवानगीचे पत्र.
महाराष्ट्रात कोरोनाला रोखण्यासाठी संचारबंदीचे आदेश असताना DHFL चे कपिल वाधवान आणि अन्य 22 जणांना खंडाळ्यातून महाबळेश्वर जाण्यासाठी पत्र देणारे सनदी अधिकारी अमिताभ गुप्ता (Amitabh Gupta) यांच्यावर देखील गृह खात्याकडून कारवाई करण्यात आली आहे.
ANI ट्वीट
Palghar Mob Lynching: पालघर घटना घडत असताना पोलिस काय करत होते? RSS प्रमुख मोहन भागवतांचा प्रश्न - Watch Video
दरम्यान वाधवान यांच्यावर अंडरवर्ल्ड डॉन इक्बाल मिर्चीशी संबंध आणि ‘YES Bank’कडून घेतलेले कर्ज थकित झाल्याप्रकरणी ईडीकडून मनी लॉन्डरिंग कायद्या अंतर्गत तपास सुरु आहे. वाधवान पिता पुत्रांना फेब्रुवारी महिन्यातच जामीनावर सोडण्यात आले होते.