Maharashtra Job Vacancies 2020: लॉकडाऊन मध्ये जॉब गमावलेल्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, सरकारकडून ऑनलाईन मेळाव्याचे आयोजिन, कशी कराल नोंदणी?

या बेरोजगार तरुणांसाठी सरकारने ऑनलाईन मेळाव्याचे आयोजन केले आहे.यासाठी तरुणांनी ऑनलाईन नोंदणी (Online Registration) करणे गरजेचे आहे.

(Photo credit: archived, edited, representative image)

कोरोना व्हायरसमुळे महाराष्ट्रातील लॉकडाऊनमुळे (Lockdown) अनेकांच्या नोक-या जाऊन ते बेरोजगार झाले. कोरोना व्हायरसमुळे आलेली महागाई आणि त्यात गेलेली नोकरी यामुळे हे बेरोजगार फार चिंतेत आहेत. यामुळे अशा बेरोजगार तरुणांसाठी ठाकरे सरकारने नोकरीची सुवर्णसंधी (Job Vacancies) उपलब्ध करुन दिली आहे. ज्यात सरकारने 275 कंपन्यांशी संपर्क साधून 43 हजार 34 जागांसाठी रोजगार उपलब्ध होणार आहे. या बेरोजगार तरुणांसाठी सरकारने ऑनलाईन मेळाव्याचे आयोजन केले आहे.यासाठी तरुणांनी ऑनलाईन नोंदणी (Online Registration) करणे गरजेचे आहे.

या मेळाव्यात दहावी-बारावी उत्तीर्ण उमेदवारांपासून अभियांत्रिकीपर्यंतची शैक्षणिक पात्रता असलेल्यांना 18,000 रुपयांपर्यंतची नोकरी मिळू शकते. मात्र यासाठी या मेळाव्यात सहभागी होणे गरजेचे आहे आणि त्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे महत्त्वाचे आहे.वाचा- Maharashtra FYJC 2nd Merit List 2020: महाराष्ट्र एफवायजेसी दुसरी गुणवत्ता यादी जाहीर, कशी पाहाल मेरिट लिस्ट?

या रोजगार मेळाव्यासाठी ऑनलाईन नोंदणी कशी कराल?

1. या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे

2. त्यानंतर त्यातील Job Seeker पर्यायावर जाऊन अर्जदारांनी लॉग इन करावे.

3. मग त्यांना आयडी व पासवर्ड मिळेल.

4. त्यानंतर त्यांना डॅशबोर्डवर पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर या पर्यायावर क्लिक केल्यावर संबंधितांना जिल्हा निवडता येईल

ही प्रक्रिया केल्यावर सेट लेव्हल मेगा जॉब फेअर पर्यायाद्वारे रिक्तपदांची माहिती मिळणार असून, त्यानुसार अर्जदारांनी पसंतीक्रम नोंदविणे आवश्यक आहे. त्यानंतर अर्जदारांना मुलाखतीचे ठिकाण, दिनांक, वेळ हे एसएमएस किंवा ई-मेलद्वारे पाठवण्यात येणार आहे.

दरम्यान बीड, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, सातारा, धुळे आणि अहमदनगर अशा 7 जिल्ह्यातील तलाठी (Talathi) पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांच्या तलाठी पदभरतीचा मार्ग मोकळा आहे. एसईबीसी (SEBC) संवर्गातील पदे वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार असल्याची माहिती, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी दिली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now