Maharashtra Guardian Minister: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून जिल्हानिहाय पालकमंत्रांच्या नियुक्त्या; पहा संपूर्ण यादी
नुकतीच याची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये अपेक्षेप्रमाणे अजित पवार यांना पालकमंत्री म्हणून पुण्याची जबबदारी देण्यात आली आहे
Maharashtra Guardian Minister: राज्यात महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार सत्तेत आले. त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसमध्ये बरेच दिवस मंत्रिमंडळाबाबत चर्चा सुरु होती. अखेर मंत्रिमंडळाचा विस्तारही पार पडला व खाते वाटपही झाले.
आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी मंत्री आणि राज्यमंत्री यांच्या जिल्हानिहाय पालकमंत्री म्हणून नियुक्त्या केल्या आहेत. नुकतीच याची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये अपेक्षेप्रमाणे अजित पवार यांना पालकमंत्री म्हणून पुण्याची जबबदारी देण्यात आली आहे, तर पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे मुंबई उपनगरची जबादारी असणार आहे.
पहा जिल्हानिहाय पालकमंत्र्यांची संपूर्ण यादी -
- पुणे- अजित अनंतराव पवार
- मुंबई शहर- अस्लम रमजान अली शेख
- मुंबई उपनगर- आदित्य उद्धव ठाकरे
- ठाणे- एकनाथ संभाजी शिंदे
- रायगड - आदिती सुनिल तटकरे
- रत्नागिरी- ॲड. अनिल दत्तात्रय परब
- सिंधुदुर्ग- उदय रविंद्र सामंत
- पालघर- दादाजी दगडू भुसे
- नाशिक- छगन चंद्रकांत भुजबळ
- धुळे- अब्दुल नबी सत्तार
- नंदुरबार- ॲड. के.सी. पाडवी
- जळगाव- गुलाबराव रघुनाथ पाटील
- अहमदनगर- हसन मियालाल मुश्रीफ
- सातारा- शामराव ऊर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील
- सांगली- जयंत राजाराम पाटील
- सोलापूर- दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील
- कोल्हापूर- विजय ऊर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात
- औरंगाबाद- सुभाष राजाराम देसाई
- जालना- राजेश अंकुशराव टोपे
- परभणी- नवाब मोहम्मद इस्लाम मलिक
- हिंगोली- वर्षा एकनाथ गायकवाड
- बीड- धनंजय पंडितराव मुंडे
- नांदेड- अशोक शंकरराव चव्हाण
- उस्मानाबाद- शंकरराव यशवंतराव गडाख
- लातूर- अमित विलासराव देशमुख
- अमरावती- ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर (सोनावणे)
- अकोला- ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू
- वाशिम- शंभुराज शिवाजीराव देसाई
- बुलढाणा- राजेंद्र भास्करराव शिंगणे
- यवतमाळ- संजय दुलीचंद राठोड
- नागपूर- डॉ. नितीन काशिनाथ राऊत
- वर्धा- सुनिल छत्रपाल केदार
- भंडारा- सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील
- गोंदिया- अनिल वसंतराव देशमुख
- चंद्रपूर- विजय नामदेवराव वडेट्टीवार
- गडचिरोली- एकनाथ संभाजी शिंदे
दरम्यान, 2019 च्या शेवटी म्हणजे 30 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला होता. त्यानंतर तीनही पक्षांमध्ये खातेवाटपाबद्दल अनेक चर्चा झाल्या. अखेर महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारचे खातेवाटप 5 जानेवारी रोजी अधिकृत रित्या जाहीर करण्यात आले. त्यानंतर आज जिल्हानिहाय पालकमंत्र्यांची नेमणूक करण्यात आली.