Praveen Pardeshi यांच्यासह 7 IAS Officers ची महाराष्ट्र राज्य सरकार कडून बदली

पी. फड, पंकज आशिया, राहुल गुप्ता, मंजू जिंदाल, मिताली सेठी आहेत.

Maharashtra Government | (File Image)

महाराष्ट्र सरकार कडून आज (30 जून) 7 आयएएस अधिकार्‍यांची बदली करण्यात आली आहे. यामध्ये मुंबई शहराचे माजी पालिका आयुक्त प्रवीण परदेशी (Praveen Pardeshi) यांचा देखील समावेश आहे. दरम्यान काही महिन्यांपूर्वी कोरोनाची स्थिती मुंबई मध्ये हाताबाहेर जात असल्याची स्थिती निर्माण झाली होती तेव्हा परदेशींची तातडीने उचलबांगडी करत त्यांच्याजागी इक्बाल सिंह चहल यांची नेमणूक झाली होती. आता पुन्हा परदेशी यांच्यासह अजून 6 अधिकार्‍यांची बदली आहे. आज राज्य सरकारकडून त्यासातही आयएएस अधिकार्‍यांची यादी प्रसिद्ध करत त्यांच्या नव्या नेमणूकीची माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान 7 बदली करण्यात आलेले अधिकारी प्रवीणसिंह परदेशी, रणजित कुमार, व्ही. पी. फड, पंकज आशिया, राहुल गुप्ता, मंजू जिंदाल, मिताली सेठी आहेत. आता प्रवीणसिंह परदेशी यांना मंत्रालयातील मराठी भाषा विभागामध्ये अतिरिक्त मुख्य सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. प्रवीण परदेशी हे 1985 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.  तर या बदल्यांच्या यादीमध्ये रणजित कुमार मुख्य सचिव कार्यालयात सहसचिव पदावर नियुक्त झाले आहेत.

व्ही. पी. फड उस्मानाबादच्या सीईओ पदावरून मराठवाडा स्टॅच्युटरी डेव्हलपमेंट बोर्डाच्या सदस्य सचिव पदावर आले आहेत. पंकज आशिया आता उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या सीईओ पदावर आले आहेत. मंजू जिंदाल हे जालना जिल्हा परिषदेचे सीईओ झाले आहेत. मिताली सेठी चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या सीईओ पदावर नियुक्त झाले आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif