महाराष्ट्र सरकार कडून 1 जानेवारी पासून उत्पादन शुल्कात वाढ; विदेशी मद्य महागणार
तर लहान स्वरूपाच्या ब्रँडमध्ये 5% वाढ होईल. सध्या विदेशी मद्यावर केवळ 4% शुल्क आहे.
आजपासून नव्या वर्षाला सुरुवात झाली आहे. नव्या वर्षात मध्ये बदल करण्यात आल्याने काही गोष्टी स्वस्त झाल्या आहेत. पण मद्यप्रेमींना नव्या वर्षात विदेशी ब्रॅण्डची दारू पिण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. राज्य सरकारकडून विदेशी मद्याच्या (Indian Made Foreign Liquor ) उत्पादन शुल्कामध्ये (Excise Duty )18-20 % वाढ करण्यात आल्याने भविष्यात दारू महागणार आहे. देशात तयार होणाऱ्या विदेशी मद्याच्या उत्पादन शुल्कात वाढ करण्यात येणार आहे. या दरवाढीमुळे राज्य सरकारच्या महसूलात सुमारे 500 कोटींची भर पडणार आहे. सरकारच्या निर्णयामुळे दारूच्या किंमतीत वाढ होईल.सरकारकडून नववर्षाचे गिफ्ट; आजपासून 'या' वस्तू होणार स्वस्त
कशी असेल वाढ ?
प्रीमियम आणि मध्यम स्वरूपाच्या देशात तयार होणाऱ्या विदेशी मद्याच्या उत्पादन शुल्कात वाढ सुमारे 20-25 %वाढ होणार आहे. तर लहान स्वरूपाच्या ब्रँडमध्ये 5% वाढ होईल. सध्या विदेशी मद्यावर केवळ 4% शुल्क आहे.
महाराष्ट्र राज्यामध्ये नवीन वर्षांपासून कर्मचाऱयांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. नव्या वेतन धोरणानुसार, सरकारच्या तिजोरीवर सुमारे 24 हजार कोटींचा अभिक भार पडणार आहे. म्हणूनच विविध योजनांसाठी निधीची कमतरता भरून काढण्यासाठी सरकारने राज्यात उत्पादन शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला असावा असे म्हटले जात आहे.