Maharashtra: गरज असेल तरच अधिकृत कामासाठी मोबाईलचा वापर करा, महाराष्ट्र सरकारचे कर्मचाऱ्यांना आदेश

अशातच आता महाराष्ट्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना कामाच्या वेळेत फोनचा कमीत कमी वापर करण्याचे आवाहन केले आहे.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

Maharashtra: देशभरात पेगासस स्पायवेअरवरुन (Pegasus Spyware) सध्या वाद सुरु आहे. अशातच आता महाराष्ट्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना कामाच्या वेळेत फोनचा कमीत कमी वापर करण्याचे आवाहन केले आहे. मोबाईल फोन ऐवजी टेलिफोनचा अधिक वापर करावा असे ही त्यांनी म्हटले आहे. या संदर्भातील आदेश जाहीर करत जनरल अॅडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट यांनी म्हटले की, मोबाईल फोनचा वापर गरज असेल तरच अधिकृत कामासाठी वापरण्यात यावा.

कार्यालयात मोबाईल फोनचा कशाही प्रकारे वापर करणे हे सरकारच्या प्रतिमेला मलिल करण्यासारखे आहे. तर स्पायवेअरचा कोणताही संदर्भ न देता त्यांनी हे आदेश जाहीर केले आहेत. पुढे त्यांनी असे म्हटले की, मोबाईल फोनवरुन टेक्स मेसेज पाठवू शकता. पण त्यावेळी सुद्धा दोन व्यक्तींमधील संभाषण हे कमी वेळात आटोपेल असे करा. ऐवढेच नव्हे तर सोशल मीडियाचा कामाच्या वेळेत कमी वापर करावा असे ही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.(‘बॅनर लावणाऱ्यांनी पुणेकरांना ज्ञान देण्याच्या भानगडीत पडून हसू करून घेऊ नये’; रोहित पवार यांचा टोला)

Tweet:

तसेच खासगी फोन आल्यास मोबाईलवर बोलण्यासाठी कर्मचाऱ्याने ऑफिसच्या बाहेर जाऊन बोलावे. बोलताना आवाज एगदी कमी आणि नम्रपणे असावा. याचा दुसऱ्यांना त्रास होणार नाही याची सुद्धा काळजी कर्मचाऱ्याने घ्यावी. मात्र जर वरिष्ठांचे फोन आल्यास वेळ न घालवता ते उचलावेत असे ही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे इंटरनेटचा वापर , मेसेज पाहणे आणि ईअरफोनचा वापर करणे टाळावे. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे अधिकृत बैठकीच्या किंवा संस्थेमध्ये असताना मोबाईल फोन सायलेंटवर असे अनिवार्य असणार आहे.