देवेंद्र फडणवीस आणि नवाब मलिक यांच्या आरोपांचा तपास करावा, महाराष्ट्राची बदनामी होत असल्याने नाना पटोले यांनी केली मागणी

दोन्ही नेते एकमेकांवर आरोपप्रत्यारोप करताना दिसून येत आहेत.

Nana Patole | (Photo Credit : Facebook)

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि एनसीपी नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यामध्ये सध्या वाद सुरु आहेत. दोन्ही नेते एकमेकांवर आरोपप्रत्यारोप करताना दिसून येत आहेत. अशाच महाराष्ट्र काँग्रेसचे प्रमुख नाना पटोले (Nana Patole) यांनी असे म्हटले की, राज्यातील सध्याची राजकीय स्थिती दयनीय झाली असून त्याच्या कारणास्तव राज्याची बदनामी होत आहे.(Devendra Fadnavis Tweet: डुकरासोबत कुस्ती खेळू नये, देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट; टीकाकारांवर अप्रत्यक्ष निशाणा)

नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली आहे की, फडवणीस आणि मलिक यांच्या आरोपांचा तपास करावा. त्यांनी म्हटले, राज्यातील नेते एकमेकांवर आरोप करत आहेत. हे लावण्यात येणारे आरोप गंभीर असून उद्धव ठाकरे यांनी यामध्ये तपास करावा.

दरम्यान, राज्यत महाविकास आघाडी सरकारची सत्ता आहे. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचा समावेश आहे. काँग्रेस हा गठबंधनाचा हिस्सा असल्याने त्यांच्या प्रदेश प्रमुखांद्वारे तपास करण्याची मागणी ही महत्वाची आहे.(Nilofer Malik Khan On Amruta Fadanvis: अमृता फडणवीसांच्या 'बिगडे नवाब' ट्विटला निलोफर मलिकयांचे ट्विटवरून प्रत्युत्तर)

तर नवाब मलिक आणि फडणवीस यांनी बुधवारी एक पत्रकार परिषद घेतली. यामध्ये दोघांनी सुद्धा एकमेकांवर मोठे गंभीर आरोप लावले. त्याचसोबत अंडरवर्ल्ड सोबतच्या संबंधित मुद्द्यांवर ही विधाने केली गेली. तर दुसऱ्या बाजूला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावरुन फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. त्यांनी म्हटले की, फडणवीस यांचे समीर वानखेडे यांच्यासोबत उत्तम संबंध असल्याचे मलिक यांनी म्हटले. यामुळेच ते त्यांचा बचाव करण्यासाठी काम करत आहेत.