विधानसभा निवडणूक 2019 पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काढणार रथयात्रा; दुमदुमणार 'अब की बार 220 के पार' च्या घोषणा

निवडणूकांपूर्वी लोकांपर्यंत पोहचण्यासाठी रथयात्रा काढण्याची भाजप पक्षाची परंपरा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कायम ठेवणार आहेत.

CM Devendra Fadnavis (Photo Credits: File Photo)

निवडणूकांपूर्वी लोकांपर्यंत पोहचण्यासाठी रथयात्रा काढण्याची भाजप पक्षाची परंपरा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) कायम ठेवणार आहेत. विधानसभा निवडणूक 2019 पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील सर्व विधानसभा मतदार संघांमधून रथयात्रा काढणार आहेत. तसंच या रथयात्रेदरम्यान 'फिर एक बार शिवशाही सरकार' आणि 'अब की बार 220 के पार', अशा घोषणा दिल्या जाणार आहेत. फडणवीसांच्या या रथयात्रेला ऑगस्ट महिन्यापासून सुरुवात होईल.

ANI ट्विट:

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत भाजप सरकारने पुन्हा एकदा विजयाचा झेंडा रोवला. त्यानंतर आता राज्याचे लक्ष विधानसभा निवडणूकांकडे लागले आहे. यंदा विधानसभेच्या 288 जागांवर निवडणूका होणार आहेत. या निवडणूकीत भाजप-शिवसेनेची युती काय कमाल करणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. (विधानसभा निवडणूकीत न भूतो असा विजय होईल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास)

त्यामुळे विधानसभा निवडणूकीतील आपले यश निश्चित करण्यासाठी भाजपसह सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा निवडणूकीसाठी रथयात्रेचा फंडा आजमावणार आहेत.