Maharashtra Board SSC Exams 2022: इयत्ता 10 वी बोर्ड परीक्षा आजपासून सुरु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना वाढीव वेळ
सुमारे 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे.
राज्यभरतातून महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेतल्या जाणारी इयत्ता दहावीची परिक्षा (Maharashtra Board SSC Exams 2022) आजपासून (मंगळवार,15 मार्च) सुरु होत आहे. सुमारे 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. राज्यातील कोरोना व्हायरस (Coronavirus) महामारीच्या पार्श्वभूमीवर यांदा या परीक्षांचे आयोजन करताना अत्यंत काटेकोरपणाने विचार करण्यात आला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांसाठी सुमारे मुख्य केंद्र आणि उपकेंद्र अशा एकूण 21,384 केंद्रांवर परीक्ष होणार आहे.
राज्य मंडळाने एका परिपत्रकाद्वारे माहिती देताना सांगितले की, राज्य मंडळ प्रतीवर्षी इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेत असते. पाठीमागील वर्षी मात्र त्यात खंड पडला. कोरोनामुळे परीक्षा होऊ शकल्या नाहीत. परिणामी अंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकाल जाहीर करण्यात आला. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर कमी झाला आहे. त्यामुळे या परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे.
यंदाच्या वर्षी इयत्ता बारावीची परीक्षा 4 मार्चपासून सुरु झाली. तर आजपासून इयत्ता दहावीची परीक्षा सुरु होत आहे. कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी काही सवलतही देण्यात आली आहे. जसे की, एखाद्या विद्यार्थ्याला कोरोना व्हायरस संसर्गाचे निदान झाल्यास अथवा इतर काही वैद्यकीय अथवा अपरीहार्य कारणांमुळे विद्यार्थ्याला प्रात्यक्षिक, लेखी, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा देता आली नाही तर त्यासाठी 5 ते 22 एप्रील 2022 या काळात परीक्षा घेतली जाईल. तसेच, जुलै-ऑगस्ट महिन्यात पुरवणी परीक्षेचे आयोजन करण्याबाबत राज्य मंडळ नियोजन करत आहे, अशी माहिती राज्य मंडळाच्या परिपत्रकात दिली आहे. (हेही वाचा, Maharashtra Board HSC Exams 2022: बारावीच्या इंग्रजीच्या पेपर मध्ये चूकीच्या प्रश्नाचा प्रत्येकी 1 गुण मिळणार; बोर्डाची माहिती)
ट्विट
दरम्यान, परीक्षेसाठी इतरही तयारी करण्यात आली आहे. जसे की, 70 ते 100 गुणांची प्रश्नपत्रिका असेल तर त्यांच्यासाठी 30 मिनीटांचा अधिक वेळ दिला जाणार आहे. 40 ते 60 गुणांची प्रश्नपत्रिका असेल तर त्यासाठी 15 मिनीटांचा वेळ वाढीव मिळणार आहे. याशिवाय परीक्षेत होणारा गौरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथके, महिलांची विशेष पथके स्थापन काही ठिकाणी परीक्षा केंद्रांचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. याशिवाय परीक्षा केंद्रांवर समुपदेशकांचीही नेमणूक करण्यात आली आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांना विशेष ताण जाणवनार नाही.
परीक्षेसाठी एकूण 21, 384 परीक्षा केंद्रे आहेत. मुख्य परीक्षा केंद्रांची संख्या 5,050 तर उपकेंद्रांची संख्या 16,334 इतकी आहे. एकूण 16,38,172 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज भरलेले आहेत. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 8 लाख 89,584 तर विद्यार्थिनींची संख्या 7, 49,478 इतकी आहे.