Maharashtra Board HSC Results 2019: 12 वीचा निकाल mahresult.nic.in वर जाहीर, 10 वी लवकरच; अॅडमिशन साठी आरक्षणाचा फायदा मिळवण्यसाठी ही 5 सरकारी कागदपत्र ठेवा तयार
आरक्षणाचा फायदा घेत राखीव कोट्यातून तुम्ही इंजिनियरिंग, मेडिकल किंवा अगदी 11 वी साठी प्रवेश घेणार असाल तर काही अत्यावश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव तुम्हांला निकाल लागण्याआधीपासूनच करणं आवश्यक आहे.
देशभरात विविध बोर्डाचे दहावी, बारावी निकाल जाहीर होत आहेत. यंदा अपेक्षेप्रमाणे CBSE, ICSE बोर्डाचे निकालदेखील जाहीर झाले आहेत. आता महाराष्ट्र बोर्डाच्या 10 वी आणि 12 वी च्या विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालाचे वेध लागले आहेत. महाराष्ट्र शिक्षण मंडाळाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत दहावी आणि बारावी चे बोर्डाचे निकाल जाहीर केले जाणार आहेत. MSBSHSE 12th Std Results 2019: महाराष्ट्र बोर्ड 12 वीचा निकाल mahresult.nic.in वर घोषित; SMS आणि Online असा पहाल निकाल
निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रियेसाठी धावपळ सुरू होते. निकालाच्या प्रतीसोबतच अनेक सरकारी कागदपत्र अॅडमिशनच्या वेळेस विद्यार्थ्यांकडे असणं आवश्यक आहे. आरक्षणाचा फायदा घेत राखीव कोट्यातून तुम्ही इंजिनियरिंग, मेडिकल किंवा अगदी 11 वी साठी प्रवेश घेणार असाल तर काही अत्यावश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव तुम्हांला निकाल लागण्याआधीपासूनच करणं आवश्यक आहे. पहा प्रवेश प्रक्रियेदरम्यान आवश्यक कागदपत्र कोणती आणि ती कुठे मिळवाल?
जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र
विशिष्ट जातीच्या विद्यार्थ्यांना ठराविक कोटा आरक्षण त्यांच्या जाती निष्कर्षानुसार दिले जाते. मात्र त्यासाठी विद्यार्थ्यांना सरकारी कार्यालयातून जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी पत्र हे दोन्ही दाखल करणं आवश्यक असतं. barti.maharashtra.gov.in ला भेट दिल्यास तुम्हांला अधिक माहिती मिळू शकते. वैध जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी पत्र यानंतरच त्यांना जातीच्या आधारे आरक्षणाचा फायदा घेऊन अॅडमिशन घेता येते. Maratha Caste Certificate : जात प्रमाणपत्र ऑनलाईन, ऑफलाईन मिळवण्यासाठी अर्ज कसा कराल? त्यासाठी आवश्यक कागदपत्र कोणती?
नॉन क्रिमी लेयर सर्टिफिकेट
ओबीसी (इतर मागासवर्गीय ) प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जातीसोबतच आर्थिक सवलत मिळवण्यासाठी नॉन क्रिमी लेयर सर्टीफिकेट सादर करणं आवश्यक असते. पालक Class I / Class A सरकारी कर्मचारी नसल्यास तसेच त्यांचे एकूण उत्पन्न 8 लाख रूपयांपेक्षा कमी असल्यास त्यांना नॉन क्रिमी लेयर सर्टीफिकेट दिले जाते. त्याच्या आधारे फीमध्ये सवलत मिळते.
डोमेसाईल सर्टिफिकेट
डोमेसाईल सर्टिफिकेट च्या आधारे तुम्ही राष्ट्रीयत्त्वाचा दाखला सादर करता. तुम्ही विशिष्ट राज्यामध्ये 15 वर्ष राहत असल्याचा दाखला डोमेसाईल सर्टिफिकेटच्या माध्यमातून सादर करता. इंजिनियरिंगच्या प्रवेशप्रक्रियेमध्ये तुम्हांला महाराष्ट्र राज्यासाठी आरक्षित कोट्यातून राज्यभर कोणत्याही कॉलेजमध्ये प्रवेश मिळवायचा असेल तर डोमेसाईल सर्टिफिकेट सादर करूनच त्या आरक्षणाचा फायदा घेता येऊ शकतो.
उत्पन्नाचा दाखला
फी मध्ये सवलत मिळवण्यासाठी तुम्हांला उत्पन्नाचा दाखला सादर करणं आवश्यक आहे. त्यासाठी पालकांचे उत्पन्न किती आहे? याचा दाखला सरकारी कार्यालयातून घेणं आवश्यक आहे.
प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्र तहसीलदार कार्यालय, सेतू ऑफिसमध्ये ही कागदपत्र मिळू शकतात. अधिक माहितीसाठी http://mr.vikaspedia.in येथे भेट द्या. ऑनलाईन आणि ऑफलाईन माध्यामातून या कागदपत्रासाठी अर्ज करता येऊ शकते तसेच डाऊनलोड करता येईल. मात्र अर्ज दाखल करण्यासाठी ऑफिसमध्ये जावं लागते