24 जानेवारीला महाराष्ट्र बंद! नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडीची घोषणा

यातच वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) शुक्रवारी 24 जानेवारी रोजी महाराष्ट्र बंदची (Maharashtra Bandh) हाक दिली आहे.

Prakash Ambedkar (Photo Credit: Facebook)

नागरीकत्व दुरूस्ती कायदा (CAA) हा संपूर्ण देशभरात लागू झाला असून या कायद्याला अजूनही अनेक राज्यातून विरोध दर्शवला जात आहे. यातच वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) शुक्रवारी 24 जानेवारी रोजी महाराष्ट्र बंदची (Maharashtra Bandh) हाक दिली आहे. मुंबई (Mumbai) येथील दादर (Dadar) परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात नुकतीच वंचित बहुजन आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे.

देशात नागरिकत्व दुरूस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी विरोधात अनेक निदर्शने करण्यात आली होती. सध्या नागरिक दुरूस्ती कायदा संपूर्ण देशात लागू झाला असून अनेक राज्यातून या कायद्याच्या विरोधात आवाज उठवला जात आहे. यातच वंचित बहुजन आघाडीने 24 जानेवारीला नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या विरोधात महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी नुकतीच पत्रकार परिषेद घेऊन याबाबतीत घोषणा केली आहे. त्यावेळी ते म्हणाले की, केंद्र सरकार दडपशाही करुन हा कायदा लागू करण्याचा प्रयत्न करत आहे. महत्वाचे म्हणजे, देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. तसेच जीएसटी, नोटबंदीमुळे सरकारला पुरेसा निधी मिळत नाही. याला केवळ केंद्र सरकार जबाबदार असून त्याचा निषेध करण्यासाठी बंद पुकारण्यात आला आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी नमूद केले आहे. हे देखील वाचा- Sangli Bandh: संजय राऊत यांनी उदयनराजे भोसले यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ संभाजी भिडे यांच्याकडून उद्या सांगली बंदचे आवाहन

एएनआयचे ट्वीट-

नागरिकत्व दुरूस्ती कायदा आणि एनआरसी यांच्या विरोधात महाराष्ट्रातील ज्या संघटानांनी अंदोलने केली होती. अशा सर्व संघटनांना वंचित बहुजन आघाडीने आमंत्रित केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला असून तब्बल 35 संघटनांचे प्रमुख पदाधिकारी बैठिकाला उपस्थित होते.