Maharashtra Assembly Election 2019: अखेर शिवसेना-भाजप महायुतीची घोषणा; जागावाटपावरून सेनेचे आमदार नाराज, बंडाची तयारी
त्यानुसार एका संयुक्त पत्राद्वारे महायुतीची (BJP Shivsena Alliance) घोषणा करण्यात आली आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही महायुतीसोबतच निवडणुकांना सामोरे जाऊ असे सांगितले आहे.
विधानसभा निवडणुका (Maharashtra Assembly Election 2019) जस जशा जवळ येत आहेत तसे पक्षांतर्गत हालचालींना वेग येत आहे. नुकतेच आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी आपली उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर आता गेले कित्येक दिवस भाजप-सेनेमध्ये (BJP Shivsena) चालू असलेल्या युतीच्या चर्चेला अखेर पूर्ण विराम मिळाला आहे. चंद्रकांत पाटील यांनी दोन्ही पक्षांमध्ये युती झाली आहे, लवकरच अधिकृत घोषणा केली जाईल असे सांगितले होते. त्यानुसार एका संयुक्त पत्राद्वारे महायुतीची (BJP Shivsena Alliance) घोषणा करण्यात आली आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही महायुतीसोबतच निवडणुकांना सामोरे जाऊ असे सांगून शिक्कामोर्तब केले.
महायुतीबाबत प्रसिद्ध करण्यात आलेले परिपत्रक -
ही महायुती भाजप, शिवसेना, रिपाई, शिवसंग्राम, रासप आणि रयतक्रांती अशा पक्षांमध्ये झालेली आहे. महादेव जानकार, विनायक मेटे, रामदास आठवले, सदाभाऊ खोत या नेत्यांशी चर्चा झाल्यानंतर हा निर्णय घेतला गेला. चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस याबाबत घोषणा करतील असे सांगितले होते. मात्र दोन्ही नेते आपापल्या कामांमध्ये व्यस्त असल्याने हे संयुक्त पत्रक प्रसिद्ध करण्यात आले. देवेंद्र फडणवीस नागपूर येथे पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमामध्ये व्यस्त आहेत तर, उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जागावाटपाबद्दल चर्चा चालू आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील आणि सुभाष देसाई यांची स्वाक्षरी असलेले हे पत्रक प्रसिद्ध करून महायुतीची घोषणा झाली. (हेही वाचा: Maharashtra Assembly Elections 2019: वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार; शिवसेनेच्या मेळाव्यात मोठी घोषणा)
मात्र अजूनही राज्यातील अशा 5-6 जागा आहेत ज्याबाबत दोन्ही पक्षांमध्ये कोणतेही एकमत झाले नाही. यातील एक महत्वाचा म्हणजे वडाळा हा मतदारसंघ. शिवसेनेच्या श्रद्धा जाधव यांच्या वडाळा जागेबद्दल 7 तास उलटूनही उमेदवारीवर निर्णय झाला नाही, यामुळे त्या बंडाच्या तयारीत असलेल्या दिसत आहेत. हीच स्थिती कोथरूड, कागल मतदारसंघातही आहे. कागलची जागा शिवसेनेला गेल्याने समरजीत घाटगे यांनी राजीनामा दिला आहे. अशाप्रकारे सेनेमध्ये आमदारांचे बंड चालू झाले आहे. आता जागावाटपांच्या चर्चेनंतर कोणता पक्ष किती जागा लढवेल ते समजेल.