IPL Auction 2025 Live

Lok Sabha Elections 2019: सुशील कुमार शिंदे, प्रकाश आंबेडकर आणि डॉ. जयसिद्धेवर स्वामी यांच्यामध्ये रंगणार सोलापूर लोकसभा मतदारसंघात लढत; उमेदवारीचा अर्ज दाखल करताना शक्तीप्रदर्शन

या दिवशी बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड उस्मानाबाद लातूर, सोलापूर लोकसभा मतदार संघात मतदान आहे.

Solapur Lok Sabha Constituency (Photo Credits: Twitter)

लोकसभा 2019 ची धूम हळूहळू रंगयला सुरूवात झाली आहे. यामध्ये सोलापुर मतदार संघात यंदा तिहेरी लढत पहायला मिळणार आहे. यामध्ये कॉंग्रेसचे सुशीलकुमार शिंदे (Sushil Kumar Shinde), भाजपाचे डॉ. जयसिद्धेवर स्वामी (Dr. Jayshiddheshwar Swami) आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यामध्ये लढत होईल. आज प्रकाश आंबेडकर, सुशीलकुमार शिंदे यांनी उमेदवारीचा अर्ज दाखल केला आहे.

सोलापूरमध्ये सुशील कुमार शिंदे यांनी लोकसभेचा अर्ज दाखल करताना कॉंग्रेस कार्यकर्त्यांसह मोठं शक्तीप्रदर्शन केलं. यावेळेस आमदार प्रणिती शिंदे देखील उपस्थित होत्या. यावेळेस शिंदेंनी प्रकाश आंबेडकरांवर टीका करणं टाळलं आहे. या दोन दिग्गजांसमोर भारतीय जनता पक्षाने डॉ. जयसिद्धेवर स्वामींना तिकीट दिलं आहे. त्यामुळे आता सोलापुर मतदारसंघामध्ये चुरशीची लढत होणार आहे. प्रकाश आंबेडकर यंदा पहिल्यांदाच आकोला शहराबाहेरील मतदार संघातून लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांनी देखील शक्ती प्रदर्शन करत उमेदवारीचा अर्ज दाखल केला आहे.

सोलापूर मतदार संघामध्ये 18 एप्रिल 2019 दिवशी मतदान होणार आहे. या दिवशी बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड उस्मानाबाद लातूर, सोलापूर लोकसभा मतदार संघात मतदान आहे.