Khichdi Scam Case: लोकसभा उमेदवार अमोल कीर्तिकर यांना दुसऱ्यांदा ईडीचे समन्स, राजकाराणात खळबळ

लोकसभा उमेदवार अमोल कीर्तिकर यांना ईडी करूड खिचडी घोटाळ्याप्रकरणात चौकशीसाठी समन्स बजावले आहे.

Amol Kirtikar PC INSTA

Khichdi Scam Case: शिवसेनेचे (UBT) लोकसभा उमेदवार अमोल कीर्तिकर यांना ईडी करूड खिचडी घोटाळ्याप्रकरणात चौकशीसाठी समन्स बजावले आहे. या घटनेनंतर पुन्हा राजकारणात खळबळ उडाली आहे. अमोल कीर्तिकर यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी)ने दुसऱ्यांदा समन्स पाठवले आहे. येत्या ८ एप्रिला रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे.  ईडीने खिचडी घोटाळ्यात सूरज चव्हाण, शिवसेनेचे यूबीटी सचिव, बीएमसी अधिकारी आणि जवळचे सहकारी यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. (हेही वाचा- शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे निधन)

मिळालेल्या माहितीसाठी, बुधवारी खिचडी घोटाळ्यातील सहभागाबाबत अंमलबजावणी संचालनायसमोर हजर रहाण्यापासून सूट देण्याची विनंती केली. त्याच दिवशी पक्षाने त्यांना मुंबई उत्तर पश्चिम मतदारासंघातून उमेदवार म्हणून घोषित केले.ऐन लोकसभाच्या निवडणूकीत उध्दव बाळा साहेब ठाकरे पक्षाचे नेते अमोल कीर्तिकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

कीर्तिकर यांचे वकिल दिलीप साटले यांनी बॅलार्ड पिअर येथील ईडी कार्यालय गाठले आणि नियोजित वचनबद्धतेमुळे कीर्तीकर चौकशीसाठी उपस्थित राहू शकत नसल्याचा अर्ज सादर केला. बृहन्मुंबई महानगरपालिकेने कोविड १९ साथीच्या आजाराच्या लॉकडाऊन दरम्यान बेघर झालेल्या आणि स्थंलातरित कामगारांना अन्न म्हणून खिचडीच्या वाटपात १ कोटी रुपयांच्या घोटाळा  केल्याचा आरोप केला आहे. तेव्हा उध्दव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि युती महाविकास आघाडी सरकार चालवत होती.