Leopard Attack News: बिबट्याने घराच्या अंगणातून मुलाला उचलले, शेतात नेऊन खाल्ले; चंद्रपूर येथील घटना

दुसऱ्या दिवशी या मुलाचा अर्थवटावस्थे मृतदेह सापडला. चंद्रपूर(Chandrapur) जिल्ह्यातील सावली तालुक्यात बोरमाळा (Bormala Village) येथे ही धक्कादायक घटना घडली आहे.

Leopard | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Chandrapur News: घराच्या अंगणात असलेल्या लहान मुलाला घेऊन बिबट्या चक्क जंगलात गेला. दुसऱ्या दिवशी या मुलाचा अर्थवटावस्थे मृतदेह सापडला. चंद्रपूर(Chandrapur) जिल्ह्यातील सावली तालुक्यात बोरमाळा (Bormala Village) येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. तेलंगणा राज्यातील एक कुटुंब चंद्रपुरातील सावली (Savli Taluka) तालुक्यात मजूरीसाठी आले होते. मिरची तोडण्याच्या कामसाठी आलेल्या या कुटुंबातील लहान मुलगा घराच्या अंगणात होता. त्याची आईही तिथेच होती. पण, तितक्यात बिबट्या आला आणि त्याने मुलाला उचलून जंगला धूम ठोकली. बाळाला उचलून घेऊन जाताना आईने पाहिले. तिने आरडाओरडा करण्याचाही प्रयत्न केला. आवाज एकून नागरिक जमा झाले तोवर बिबट्या दूर गेला होता.

जमलेल्या नागरिकांनी घटनेची माहिती मिळाल्यावर बिबट्या गेला त्या ठिकाणी शोधाशोध सुरु झाली. परंतू, मुलाचा शोध लागला नाही. दुसऱ्या दिवशी जंगलात दूरच्या ठिकाणी मुलाचा मृतदेह अर्धवटावस्थेत आढळून आला. हर्षल कारमेंगे असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. घरासमोर अंगणात शौचास बसलेल्या ठिकाणीच बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृत बालकाच्या कुटुंबाची चौकशी केली. मात्र, मुलगा हाकनाक गेला. महत्त्वाचे असे की, या दाम्पत्यास एकच आपत्य होते. त्यामुळे परिसरातून आनखी हळहळ व्यक्त होत आहे. चंद्रपुरातील सावली तालुक्यात बिबट्याचे हल्ले वाढले आहेत. आतापर्यंत तब्बल 19 नागरिकांचा बिबट्याच्या हल्ल्यात बळी गेला आहे. त्यामुळे वाघांच्या बंदोबस्ताची मागणी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर होत आहे. (हेही वाचा, Leopard Attacks Girl in Kolhapur: कोल्हापूरच्या शाहूवाडी मध्ये 10 वर्षीय मुलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू)

अलिकडच्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात मानव आणि बिबट्या यांच्या संघर्षाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. कारण बिबट्या अन्नाच्या शोधात मानवी वस्तीत जातात. राज्य सरकारने हा संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. जसे की स्थानिक समुदायांसाठी जागरूकता कार्यक्रम राबवणे, मानवी सुरक्षेला धोका निर्माण करणारे बिबट्या पकडण्यासाठी आणि त्यांचे स्थलांतर करण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी वापरणे वगैरे.

दरम्यान, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की भारतीय कायद्यानुसार बिबट्या धोक्यात आहेत आणि संरक्षित आहेत आणि त्यांना योग्य अधिकाराशिवाय मारणे किंवा पकडणे बेकायदेशीर आहे. म्हणूनच, संघर्षाचा धोका कमी करताना या प्राण्यांसोबत त्यांच्या नैसर्गिक अधिवासात कसे राहायचे हे शिकणे लोकांसाठी महत्त्वाचे आहे.