Laxman Hake Jalna Hunger Strike: लक्ष्मण हाके यांचे उपोषण स्थगित, राज्य सरकारच्या आश्वासनानंतर निर्णय
छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या मंत्र्यांचे एक शिष्टमंडळाने केलेल्या यशस्वी वाटाघाटीनंतर हा निर्णय घेण्यात आला.
ओबसी आरक्षण (OBC Reservation) बचाव मुद्द्यावरुन प्राध्यापक लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी सुरु केलेले उपोषण सोडले आहे आणि सोबतच सुरु असलेले अंदोलनही स्थगित करण्यात आले आहे. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या मंत्र्यांचे एक शिष्टमंडळाने केलेल्या यशस्वी वाटाघाटीनंतर हा निर्णय घेण्यात आला. हाके यांच्या मागणीव राज्य सरकार सकारात्मक असून ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागू दिला जाणार नाही, असे ठोस आश्वासन मिळाल्यावरच हाके यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
ओबीसी आरक्षणावर सरकारने भूमिका स्पष्ट करण्याची मागणी
छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने लक्ष्मण हाके यांना ओबीसी आरक्षण विषयावर राज्य सरकारची काय भूमिका आहे, याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यानंतर या शिष्टमंडळाने लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी आपले उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती करण्यात आली. विनंतीचा मान राखत आणि ठोस आश्वासन मिळवत आंदोलनकर्त्यांनी आपले उपोषण मागे घेतले आणि आंदोलनही स्थगित केले. दरम्यान, या वेळी बोलताना लक्ष्मण हाके यांनी म्हटले की, ओबीसी आरक्षण मिळविण्यासाठी बोगस कुणबी सर्टिफिकेट देणाऱ्या आणि घेणाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्याचे ठोस आश्वासन राज्य सरकारने आपणास दिले आहे. हे सरकार न्याय देईल अशी अपेक्षा आहे. यासोबत आमची मागणी आहे की, राज्य सरकारने आगामी पंचायत राज निवडणुका ओबीसी आरक्षण देऊन करणार की त्याशिवाय, याबाबत स्पष्टता द्यावी. (हेही वाचा, Maratha OBC Reservation: ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी लक्ष्मण हाकेंकडून प्राणांतिक उपोषणाची घोषणा; आंतरवाली सराटीतच करणार उपोषण)
सर्वपक्षीय बैठकीतून तोडगा काढण्याचे आश्वासन
दरम्यान, आरक्षणाच्या मुद्द्यावर अधिवेशन काळात सर्वपक्षीय बैठक घेतली जाईल. त्यात चर्चा करुन पुढचा निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन राज्य सरकारच्या शिष्ठमंडळाने दिले आहे. पण आम्ही त्यावर विश्वास ठेवणार नाही. जोवर हे सरकार आमच्या मागण्या मान्य करत नाही, तोवर आम्ही आंदोलन सुरुच ठेवणार आहोत. हे आंदोलन केवळ तात्पूरत्या स्वरुपात रद्द करण्यात आले असल्याचेही प्रा. लक्ष्मण हाके यांनी सांगितले. (हेही वाचा, Chhagan Bhujbal on Ajit Pawar: अजित पवार यांच्यामुळे भाजपला फटका; छगन भुजबळ यांच्याकडून स्फोटक वक्तव्य; सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभा उमेदवारीवरुनही नाराजी)
छगन भुजबळ यांचा हल्लाबोल
आरक्षण हा गरीबी हटाव योजना नाही. आम्ही ओबीसी आहोत आणि आमच्यावर पिढ्यानपिढ्या अन्याय झाला आहे. त्यांची दादागिरी आम्ही कुठवर सहन करायची? आम्ही गरीब आहोत याचा अर्थ आम्हाल काही कळत नाही, आम्ही मुके आहोत असा नाही. अन्यायग्रस्त समाज हळूहळू पुढे यावा यासाठीच आरक्षणाची तरतूद आहे. आम्ही कोणालाही घाबरत नाही. ओबीसी समाजाला जाणीवपूर्वक डावललं जातं. बीड येथून पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. ही लढाई संपली नाही. ओबीसींना लोकसभा आणि विधानसभेतही आरक्षण हवं. तिकडे ते जरांगे पाटील काय बोलतात हे त्यांचं त्यांनाही कळत नाही. राज्यात जातीनिहाय जनगणना व्हावी, असेही भुजबळ म्हणाले.