Latur News: फुगे विक्रेत्याचा गॅस स्फोट झाल्यामुळे जागीच मृत्यू, घटनेत आठ मुलं जखमी, लातूर येथील घटना
लातूर शहारात फुग्याच हवा भरणाऱ्या गॅसचा स्फोट झाल्याने एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला तर सात लहान मुलं गंभीर जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
Latur News: लातूर शहारात फुग्याच हवा भरणाऱ्या गॅसचा स्फोट झाल्याने एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला तर सात लहान मुलं गंभीर जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. जखमी झालेल्या मुलांवर शासकिय रुग्णालयात उपचार सुरु आहे. लातूर जिल्ह्यातील तावरजा कॉलनू भागात हा धक्कादायक प्रकार घडला आहे, या दुर्घटनेत फुगे विक्रेताच्या मृत्यू झाला आहे. संध्याकाळच्या वेळीस ही घटना घडली. फुगे विक्रेत कॉलनीत गॅस सिलेंडर सहित आला होता. फुगे विक्रेत्याजवळ सात ते आठ मुले थांबली होती.
फुग्यात हवा भरणारा गॅस सिलेंजर त्याच्याजवळ होता. अचनाक काही मिनीटांनी गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. स्फोटाचा मोठा आवाजाने स्थानिक घाबरले. त्यांनी घटनास्थळी धाव घेतला. या घटनेत त्याचा फुगे विक्रेत्याचा मृत्यू धाला. इतर सात ते आठ मुलं देखील गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती पोलिस ठाण्यात देण्यास आली. घटनास्थळी पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी सुधाकार वावकर आणि त्यांच्या दोन पथकांनी घटनास्थळी धाव घेतला.
घटनास्थळी रुग्णवाहिका देखील तात्काळ हजर करण्यात आली. जखमी असलेली मुलांना शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, दोन मुलांना गंभीर जखम झाले आहे. जखमी झालेल्या मुलांवर लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील यंत्रणा देखील कामाला लागली असल्याचं सांगण्यात येत आहे. डॉक्टर शैलेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या लहान मुलांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये मृत्यू झालेला फुगेवाला हा सातत्याने लातूर शहरामध्ये गॅस वरची फुगे विकत होता.
(The above story first appeared on LatestLY on Oct 16, 2023 08:40 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

