Jalgaon News: देवीची मुर्ती आणण्यासाठी गेलेल्या तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, जवगाव येथील घटना
नवरात्री उत्सावाचा जल्लोष सर्वत्र चालू असताना जळगाव मध्ये एक अपघात झाला आहे. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे.
Jalgaon News: नवरात्री उत्सावाचा जल्लोष सर्वत्र चालू असताना जळगाव मध्ये एक अपघात झाला आहे. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. जळगाव मध्ये मूर्ती आणण्यासाठी गेलेल्या वाहनाचा अपघात झाला आहे. भली मोठी मूर्ती अंगावर पडल्याने एका तरुणाला त्याचा जीव गमवाला लागला आहे. संजय कोळी असं मृत मुलाचे नाव आहेय अपघातामुळे गावात गावकरी हळहळ व्यक्त करत आहे. रविवारी पहाटे १२.१५च्या सुमारास ही घटना घडली.पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद घेण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील मेहरूण भागातील जोशी वाडा परिसरात नवरात्रोत्सवानिमित्त देवीची मूर्ती आणण्यासाठी गावातील तरुण मंडळी बऱ्हाणपूर येथे गेले होते. मूर्ती घेवून परतीच्या प्रवासात ही घटना घडली. मुक्ताईनगर तालुक्यातील पुरणाड फाट्याजवळ त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. अपघातात मुर्ती तरूणाच्या अंगावर पडली. या घटनेत तरूणाचा मृत्यू झाला. या प्रकरणात मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तरुणाच्या मृत्यूची नोंद घेण्यात आली.
देवीची मुर्ती अंगावर पडल्याने तरूणाचा दबून मृत्यू झाला आहे. संजयच्या मित्रांनी तात्काळ त्याला उपजिल्हा रुग्णालय, मुक्ताईनगर या ठिकाणी उपचारासाठी दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मयत घोषित केले. मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.शहरात या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Oct 16, 2023 07:46 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

