Lata Mangeshkar Music College: मुंबईच्या कालिना परिसरात उभे राहणार लता मंगेशकर संगीत महाविद्यालय; सरकारने दिला 7,000 चौरस मीटरचा भूखंड

सोमवारी विभागाचे प्रधान सचिव विकास रस्तोगी म्हणाले की, ते हृदयनाथ मंगेशकर (लता मंगेशकर यांचे भाऊ) यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या अहवालाची वाट पाहत आहेत, ज्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय महाविद्यालयाची कल्पना येईल

Lata Mangeshkar (Photo Credits: Getty)

सुप्रसिद्ध गायिका आणि भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या नावाने प्रस्तावित आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय आणि संग्रहालयासाठी, महाराष्ट्र सरकारने मुंबई विद्यापीठाच्या सांताक्रूझच्या कलिना कॅम्पसमध्ये 7,000 चौरस मीटरचा भूखंड दिला आहे. याबाबतचा आदेश राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने सोमवारी जारी केला. ही जमीन उपनगरीय जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सुपूर्द करण्यात येणार असून, ती कला संचालनालयाकडे सुपूर्द करण्याचा प्रस्ताव आहे. प्रस्तावित संस्था भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर इंटरनॅशनल कॉलेज ऑफ म्युझिक अँड म्युझियम म्हणून ओळखली जाईल.

ग्रंथालय संचालनालयाकडे कालिना कॅम्पसमध्ये मध्यवर्ती ग्रंथालय उभारण्यासाठी 16,188 चौरस मीटरचा भूखंड असून, त्यापैकी 7 हजार चौरस मीटर इंटरनॅशनल कॉलेज ऑफ म्युझिक अँड म्युझियमसाठी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. एका सरकारी ठरावात म्हटले आहे की, ‘ग्रंथालय संचालनालयाला कलिना कॅम्पसमध्ये भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर इंटरनॅशनल कॉलेज ऑफ म्युझिक आणि भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर म्युझियम विकसित करण्यासाठी उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाला 7,000 चौरस मीटरचा खुला भूखंड सुपूर्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.’

हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, सोमवारी विभागाचे प्रधान सचिव विकास रस्तोगी म्हणाले की, ते हृदयनाथ मंगेशकर (लता मंगेशकर यांचे भाऊ) यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या अहवालाची वाट पाहत आहेत, ज्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय महाविद्यालयाची कल्पना येईल. इंटरनॅशनल कॉलेज ऑफ म्युझिक हे मंगेशकर कुटुंबीयांच्या कल्पनेवर आधारित असेल ज्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली आहे. (हेही वाचा: महाराष्ट्रातील ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासंदर्भातील निर्णय शिंदे-फडणवीस सरकारकडून रद्द)

आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय आणि वस्तुसंग्रहालयाचा आराखडा कोणत्या आधारे तयार केला जाईल, त्याचा अहवाल देण्यास सांगितले. या समितीत उषा मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर, झाकीर हुसेन, ए आर रहमान, सुरेश वाडकर यांचा समावेश आहे. राज्य सरकारने या शैक्षणिक वर्षात संगीत महाविद्यालय सुरू करण्याचे नियोजन केले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif