Coronavirus Lockdown: भाड्याच्या घरात राहणाऱ्यांना दिलासा! घरभाडे वसूली 3 महिने पुढे ढकलण्याची राज्य सरकारची घरमालकांना सूचना
घरभाडे वसुली किमान तीन महिने पुढे ढकलावी. तसेच घरभाडे न भरल्याने कोणालाही घरातून बाहेर काढू नये अशा सूचना घरमालकांना देण्यात आल्या आहेत.
कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय, उद्योगधंदे, लहान-मोठी दुकाने बंद आहेत. त्यामुळे घराचे भाडे भरण्यापासून महिन्याभराचा प्रश्न कसा चालवायचा या चिंतेत अनेकजण आहेत. दरम्यान भाड्याच्या घरात राहणाऱ्यांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. घरभाडे वसुली किमान तीन महिने पुढे ढकलावी. तसेच घरभाडे न भरल्याने कोणालाही घरातून बाहेर काढू नये अशा सूचना घरमालकांना देण्यात आल्या आहेत. या सूचनेचे परिपत्रक महाराष्ट्र शासनाकडून जारी करण्यात आले आहे.
23 मार्च ते 3 मे या लॉकडाऊनच्या कालावधीत अनेक व्यवसाय, उद्योगधंदे बंद असल्याने सामान्यांच्या रोजगारावर परिणाम झाला असून त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन बंद झाले आहे. त्यामुळे कोरोनाच्या आरोग्य संकटात आर्थिक संकटालाही सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अनेक भाडेकरुंना या काळात भाडे भरणे शक्य होणार नाही. त्यामुळे भाडे वसुली तीन महिने पुढे ढकलावी. तसंच या काळात भाडे भरता न आल्यास भाडेकरुंना घराबाहेर काढू नये अशा सूचना घरमालकांना देण्यात आल्या आहेत. राज्यात भाड्याच्या घरात राहणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने राज्य सरकारकडून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. (राज्यातील सर्व शाळांतील वर्ग सुरू होईपर्यंत पालकांना फी भरण्यास भाग पाडू नये - वर्षा गायकवाड)
MAHARASHTRA DGIPR Tweet:
लॉकडाऊनमुळे नागरिकांचे होणारे आर्थिक हाल पाहता बँकांनी देखील 3 महिने कर्जाचे हफ्ते न भरण्याची मुभा दिली आहे.
घरातून बाहेर पडत आहात ? मग ४ तास रस्त्यावर बसा; पुणे पोलिसांनी लढवली अनोखी शक्कल : Watch Video
तसंच या काळात शाळांनी पालकांमागे फी वसुलीसाठी तगादा लागू नये असे शिक्षणमंत्र्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानंतर आता भाडे तत्त्वावर राहणाऱ्यांना राज्य सरकारच्या या महत्त्वपूर्ण निणर्यामुळे दिलासा मिळाला आहे.