Ladki Bahin Yojana: महायुतीच्या विजयात राज्यातील महिलांचा मोठा वाटा; शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लाडक्या बहिणींच्या हस्ते भव्य नागरी सत्कार

हिंदुह्रदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त 23 जानेवारी रोजी शिवसेनेकडून वांद्रे कुर्ला संकुल येथे हा सत्कार सोहळा आयोजित केल्याची माहिती शिवसेना उपनेते राहुल शेवाळे यांनी दिली. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Eknath Shinde | (Photo Credit- X)

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना राबवून अडीच कोटी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणारे लाडके भाऊ शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लाडक्या बहिणींच्या हस्ते भव्य नागरी सत्कार होणार आहे. हिंदुह्रदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त 23 जानेवारी रोजी शिवसेनेकडून वांद्रे कुर्ला संकुल येथे हा सत्कार सोहळा आयोजित केल्याची माहिती शिवसेना उपनेते राहुल शेवाळे यांनी दिली. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शेवाळे म्हणाले की जून 2022 मध्ये शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी ऐतिहासिक निर्णय घेत वंदनीय बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्याचा संकल्प केला होता. तो संकल्प लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पूर्ण झाला. त्यामुळे शिवसैनिक आणि राज्यातील तमाम नागरिकांच्या वतीने एकनाथ शिंदे आणि निवडून आलेल्या सर्व आमदार आणि खासदारांचा भव्य नागरी सत्कार केला जाणार आहे.

ते पुढे म्हणाले की, शिंदे साहेबांच्या नेतृत्वात लोकसभेत शिवसेनेचे 7 खासदार निवडून आले तर विधानसभेत शिवसेनेचे 57 आमदार निवडून आले. विधानसभेत शिवसेनेला उबाठाच्या तुलनेत 15 लाख 63 हजार 917 जास्त मते मिळाली. राज्यातील मतदारांनी शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला, असे शेवाळे म्हणाले. पक्षाने हा विजय वंदनीय बाळासाहेब ठाकरेंना समर्पित केल्याचे शेवाळे म्हणाले. महायुतीच्या विजयात लाडक्या बहिणींचा मोठा वाटा आहे. त्या लाडक्या बहिणींच्या हस्ते एकनाथ शिंदे आणि शिवसेना मंत्र्यांचा सत्कार होईल. यावेळी सोनू निगम व अवधूत गुप्ते यांचा देखील सांगीतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे शेवाळे म्हणाले. (हेही वाचा: Rahul Shewale On Maharashtra Politics: ठाकरे गटाचे 10, कॉंग्रेसचे 10 आमदार संपर्कात; 23 जानेवारीला पुन्हा राजकीय भूकंप होऊ शकतो - राहुल शेवाळे यांचा दावा)

शिवसेना आणि मुंबई महापालिकेचे भावनिक नातं आहे. मुंबईकरांनी नेहमीच शिवसेनेला धनुष्यबाणाला मतदान करुन शिवसेनेचा महापौर निवडून दिला आहे. पुन्हा मुंबई महापालिकेवर भगवा फडकवून महायुतीचा महापौर करण्याचा संकल्प शिवसेनेकडून येत्या 23 जानेवारी रोजी केला जाईल, असे शेवाळे म्हणाले. या संकल्पपूर्तीसाठी 24 जानेवारी ते 30 जानेवारी दरम्यान मुंबई शहरात शाखानिहाय बैठका घेण्यात येतील. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मुंबई शहरात नवीन कार्यकारिणीची घोषणा केली जाईल. या कार्यकारिणीच्या माध्यमातून महापालिकेची निवडणूक लढवली जाईल, असे शेवाळे म्हणाले. 9 फेब्रुवारी रोजी पक्षाचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने पक्षाकडून 23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या सदस्य नोंदणी मोहीम आणि मतदारांचे आभार मानण्यासाठी जिल्हानिहाय सभा आयोजित केल्याचे शेवाळे म्हणाले.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement