Ladki Bahin Yojana Installment: महाराष्ट्रातील महिला लाभार्थ्यांना लाडकी बहिण योजनेच्या 12 व्या हप्त्याची प्रतीक्षा; जून आणि जुलैची रक्कम एकत्र मिळणार?

राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याला चालना देण्यासाठी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या योजनेने, महिलांच्या सशक्तीकरणाला नवे आयाम दिले. सध्या, जून 2025 च्या 12 व्या हप्त्याची सर्व लाभार्थी प्रतीक्षा करत असून, जून आणि जुलै 2025 चे हप्ते एकत्रित मिळण्याबाबत चर्चा सुरू आहे.

Money | Image Used For Representational Purpose Only (Photo Credits: pixabay)

महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील (Ladki Bahin Yojana) लाभार्थी महिला जून महिन्याच्या 1500 रुपयांच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. साधारणपणे दर महिन्याच्या 15 तारखेपर्यंत ही रक्कम लाखो बहिणींच्या खात्यात डीबीटीद्वारे हस्तांतरित केली जाते. आतापर्यंत लाभार्थी महिलांना 11 हप्त्यांच्या स्वरूपात एकूण 16,500 रुपये मिळाले आहेत. मात्र आता जून महिना संपत आला तरीही अद्याप महिलांच्या खात्यात या महिन्याचे 1500 रुपये जमा झाले नाहीत. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सध्या अशीची चर्चा आहे की, जून आणि जुलैचा हप्ता एकत्र येणार आहे. परंतु याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याला चालना देण्यासाठी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या योजनेने, महिलांच्या सशक्तीकरणाला नवे आयाम दिले. सध्या, जून 2025 च्या 12 व्या हप्त्याची सर्व लाभार्थी प्रतीक्षा करत असून, जून आणि जुलै 2025 चे हप्ते एकत्रित मिळण्याबाबत चर्चा सुरू आहे. याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले होते की, जूनचा हप्ता लवकरच वितरित होईल, परंतु अजून तो झाला नाही. यामुळे जून-जुलैच्या एकत्रित हप्त्याबाबत चर्चा आहे. मात्र अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही.

महाराष्ट्र सरकारने मागील वर्षीच्या अर्थसंकल्पात माझी लाडकी बहिण योजनेची घोषणा केली, ज्याचा उद्देश 21 ते 65 वयोगटातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना स्वावलंबी बनवणे आहे. या योजनेत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये थेट त्यांच्या आधार-संलग्न बँक खात्यात जमा केले जातात, ज्यामुळे त्यांना घरगुती खर्च, आरोग्य आणि शिक्षणासाठी आर्थिक आधार मिळतो. आतापर्यंत, जुलै 2024 ते मे 2025 या कालावधीत 11 हप्ते वितरित झाले आहेत. महिला आणि बाल विकास विभागाच्या म्हणण्यानुसार, जूनच्या हप्त्याचे वितरण शेवटच्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे, परंतु अद्याप अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही. (हेही वाचा: Maharashtra Electricity Rates: महाराष्ट्रातील वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी; पहिल्या वर्षी 10 टक्के आणि 5 वर्षांत 26 टक्के वीजदर होणार कमी)

दुसरीकडे, X वर आणि स्थानिक वृत्तपत्रांमध्ये अशी चर्चा आहे की, जून आणि जुलै 2025 चे हप्ते एकत्रितपणे 3,000 रुपये म्हणून वितरित केले जाऊ शकतात. यापूर्वी, फेब्रुवारी आणि मार्च 2025 चे हप्ते एकत्रितपणे 8 मार्च 2025 रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर 2024 चे हप्ते एकत्रितपणे वितरित झाले होते. सध्या, जून-जुलैच्या एकत्रित हप्त्याबाबत कोणताही अधिकृत आदेश जारी झालेला नाही, आणि लाभार्थ्यांना याबाबत अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करावी लागेल. लाभार्थ्यांना त्यांच्या हप्त्याची स्थिती तपासण्यासाठी www.ladkibahini.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागेल.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement