Ladki Bahin Yojana July 2026 Payment Status: 'लाडकी बहीण योजना' चा जुलै महिन्याचा हफ्ता आला का? असं पहा स्टेट्स

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपयांचा हप्ता थेट बँक खात्यात जमा केला जातो. लाभार्थी महिलांना आपल्या हप्त्याची स्थिती अधिकृत पोर्टलवर कशी तपासता येईल, याबाबत सविस्तर माहिती.

Ladki Bahin

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांचा हप्ता थेट लाभ हस्तांतरण (DBT) पद्धतीने बँक खात्यात जमा केला जातो. जुलै महिन्याचा हप्ता मिळाला की नाही, याबाबत अनेक लाभार्थी महिलांमध्ये उत्सुकता आहे. अशा महिलांना अधिकृत पोर्टलवर आपल्या हप्त्याची स्थिती सहज तपासता येते. नक्की वाचा: Ladki Bahin Yojana: जुलैचा हप्ता रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर जमा, ऑगस्ट हप्ता आणि ई-केवायसीबाबत अद्याप संभ्रम .

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत कोणाला मिळतात पैसे?

महिला व बालविकास विभागामार्फत राबवली जाणारी ही योजना जुलै २०२४ मध्ये सुरू करण्यात आली. २१ ते ६५ वयोगटातील आणि कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळतो. लाभासाठी महिलेचे आधार-लिंक्ड बँक खाते असणे आवश्यक आहे.

'लाडकी बहीण योजना' हप्त्याची स्थिती कशी तपासावी

लाभार्थी महिलांना खालील पद्धतीने आपल्या हप्त्याची स्थिती तपासता येते.

अधिकृत पोर्टलवरून तपासणी:

अधिकृत संकेतस्थळ ladakibahin.maharashtra.gov.in वर जाऊन नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाद्वारे लॉगिन करावे. लॉगिन केल्यानंतर डॅशबोर्डवर अर्जाची स्थिती, ई-केवायसीची स्थिती आणि हप्ता जमा झाल्याची माहिती दिसते.

मोबाईल क्रमांकाद्वारे पडताळणी:

होमपेजवरील 'लाभार्थी स्थिती' या पर्यायावर क्लिक करून नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाकावा. त्यानंतर मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून ओळख पडताळणी करावी. यानंतर शेवटचा हप्ता, जमा झालेली रक्कम आणि बँक खात्याचे तपशील स्क्रीनवर दिसतात.

PFMS पोर्टलवरून तपासणी:

हप्ता आधीच जमा झाल्याची खात्री करण्यासाठी लाभार्थी सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली (PFMS) च्या पोर्टलवरही डीबीटी हस्तांतरणाची स्थिती तपासू शकतात. यासाठी आवश्यक तपशील भरून विनंती सादर करावी लागते.

हफ्ता आला नसल्यास काय करावे?

काही लाभार्थींचा हप्ता प्रलंबित राहण्यामागे अपूर्ण ई-केवायसी, निष्क्रिय डीबीटी, आधार-बँक लिंकिंगमधील त्रुटी किंवा चुकीचे बँक तपशील ही प्रमुख कारणे असू शकतात. अशा स्थितीत लाभार्थी महिलांनी आपले आधार आणि बँक तपशील पुन्हा तपासावेत आणि आवश्यक असल्यास अधिकृत पोर्टलवरून तक्रार नोंदवावी.

ई-केवायसीचे महत्त्व

योजनेचा नियमित लाभ मिळत राहण्यासाठी वार्षिक ई-केवायसी पडताळणी करणे बंधनकारक आहे. बनावट किंवा दुहेरी लाभार्थ्यांना वगळण्यासाठी सरकारने ही प्रक्रिया अनिवार्य केली आहे. ई-केवायसी पूर्ण नसल्यास हप्ता कायमस्वरूपी बंद होण्याची शक्यता असते, त्यामुळे ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे.

हप्त्याची निश्चित तारीख नाही

'लाडकी बहीण योजना' चा हप्ता निश्चित तारखेला जमा होत नसून, तो टप्प्याटप्प्याने कोषागाराकडून रक्कम वितरित झाल्यानंतर लाभार्थींच्या खात्यात जमा केला जातो. त्यामुळे हप्ता जमा होण्याच्या तारखेत महिन्यागणिक थोडाफार फरक पडू शकतो. लाभार्थी महिलांनी अधिकृत घोषणेची वाट पाहावी आणि केवळ शासनाच्या अधिकृत पोर्टलवरूनच आपल्या हप्त्याची खात्री करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement