Maharashtra Weather: पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात पुढील 24 तासांत पावसाची शक्यता; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा
मात्र अजूनही पावसाचा जोर ओसरला नसल्याचे दिसत आहे. येत्या 2 ते 3 दिवसांत दक्षिण व पश्चिम महाराष्ट्र (Western Maharashtra) आणि गोव्यात (Goa) काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे
महाराष्ट्रात यावर्षी पावसाने (Rainfall) धुमाकूळ घातला. पावसाच्या वाढलेल्या कालावधीसह अवकाळी पावसाने शेकऱ्यांच्या तोंडचे पाणीच पळवले. अशा परिस्थितीत हिवाळाही लांबणीवर पडला. मात्र अजूनही पावसाचा जोर ओसरला नसल्याचे दिसत आहे. येत्या 2 ते 3 दिवसांत दक्षिण व पश्चिम महाराष्ट्र (Western Maharashtra) आणि गोव्यात (Goa) काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामान खात्याने (India Meteorological Department) 3 डिसेंबर रोजी संध्याकाळी जाहीर केले. या पार्श्वभूमीवर बुधवारी तसेच गुरुवारी मच्छीमारांना समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आला.
लक्षद्वीपजवळ कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने त्याचा परिणाम अरबी समुद्रावर होणार आहे. त्यामुळे समुद्रानजीकच्या परिसरात पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसासह काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, पुणे, नाशिक येथेही हलक्या सरींचा पाऊस होऊ शकेल.
भारतीय हवामान खाते ट्विट -
मुंबईमधील तापमानाबाबत बोलायचे झाले तर, सांताक्रूझ येथे कमाल तापमान 35.1 डिग्री सेल्सियस होते, जे सामान्यपेक्षा दोन डिग्री जास्त होते. कुलाबा येथे 35 अंश सेल्सिअस तापमान होते, तर किमान तापमान 23-25 अंश सेल्सिअस दरम्यान होते. 2009 पासून नोव्हेंबरचे तापमान सर्वात कमी नोंदवले गेले आहे. नोव्हेंबरमध्ये शहरातील किमान तापमान 20 अंश सेल्सिअसपेक्षा कमी होऊ शकले नाही. (हेही वाचा: मोसमी पाऊस भारतात दीर्घकाळ थांबल्याने ऑस्ट्रेलियात वणवे; 3 ठार, 150 घरे जळून खाक)
2009 ते 2018 पर्यंत सर्वात कमी किमान तापमान 14 ते 19 अंश सेल्सिअस दरम्यान होते. 19 नोव्हेंबर 1950 रोजी सर्वात कमी थंड दिवस होता, तेव्हा किमान तापमान 13..3 अंश सेल्सिअस पर्यंत खाली आले होते.