Kolhapur Murder Case: आईची निर्घुण हत्या करून तिचं काळीज भाजून खाण्याच्या प्रयत्नात असलेल्या नराधमाला अखेर फाशीची शिक्षा; कोल्हापूरातील पहिलीच फाशी

कोल्हापूरात कवळा नाका मधील माकडवाला वसाहतीत ही हत्या 4 वर्षांपूर्वीची आहे.

Image used for represenational purpose (File Photo)

आईचा निर्घुण खून करून तिचं काळीज भाजून खाण्याच्या प्रयत्न केलेल्या एका नराधमाला आज (8 जुलै) फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. कोल्हापूर मध्ये ही घटना 2017 सालची आहे. सुनील कुचकोरवी (Sunil Kuchkorvi) असं आरोपीचं नाव असून त्याने आईकडून दारूसाठी पैसे न मिळाल्याने हा घृणास्पद प्रकार केल्याचं उघड झाले आहे. पोलिस तपासानंतर आज कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने (Kolhapur Session Court) सुनीलला फाशी सुनावली आहे. दरम्यान कोल्हापूरच्या इतिहासामध्ये फाशीची शिक्षा सुनावण्याचा हा पहिलाच प्रकार आहे.

कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायाधीश महेश जाधव यांनी आज महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. कोल्हापूरात कवळा नाका मधील माकडवाला वसाहतीत ही हत्या 4 वर्षांपूर्वीची आहे. आईची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे करून सुनीलने किळसवाणा प्रकार केला होता. शाहूपुरी पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून त्याचा तपास झाला. दरम्यान सुनीलला जन्मठेप द्यायची की फाशी? हा प्रश्न होता पण कोर्टाने सुनीलचे कृत्य माणूसकीला धरून नसल्याचं सांगत फाशीची शिक्षा ठोठावली आहे. (नक्की वाचा: Mumbai Murder Case: वांद्रे परिसरात 21 वर्षीय तरूणाकडून प्रेयसीची हत्या; खोट्या बलात्काराच्या आरोपांना, दीड लाख रूपयांच्या मागणीतून उचललं टोकाचं पाऊल).

दरम्यान काही दिवसांपूर्वी मुंबई मध्ये एका पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा खून करून त्याचा मृतदेह स्वतःच्या घरातच स्वयंपाक घरात पुरल्याची मनाला विषण्ण करणारी घटना समोर आली होती. यामध्ये मृत बापाच्या चिमुकल्या मुलीने सारा प्रकार पाहिला होता आणि तिने कुटुंबियांना, पोलिसांना माहिती दिल्यानंतर या हत्येचं रहस्य उघड झाले होते.