Kolhapur Crime: कोल्हापूरात शाररिक संबंधास नकार दिल्याने संतापून विधवा महिलेचा खून, मृतदेह ऊसाच्या फडात टाकून पेटवलं, आरोपीला अटक

महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. जिल्ह्यातील आजरा येथे एका महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली होती.

Kolhapur Crime: कोल्हापूरात शाररिक संबंधास नकार दिल्याने संतापून विधवा महिलेचा खून, मृतदेह ऊसाच्या फडात टाकून पेटवलं, आरोपीला अटक
Denial of Sex | (Photo courtesy: archived, edited, symbolic)

Kolhapur Crime: महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. जिल्ह्यातील आजरा येथे एका महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली होती. ही घटना गुरुवारी भादवण गावात घडली. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने या हत्याकांड उघड केला आहे. शरिर संबंधाला विरोध केल्याने एका महिलेचा खून करण्यात आला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी महिलेचा मृतदेह ऊसाच्या फडात नेऊन आग लावली. या घटनेनंतर संपुर्ण गाव हादरलं होते. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच तपास कार्य सुरु केलं. या तपास कार्यात स्वत: आरोपी पोलिसांसोबत होता. (हेही वाचा- मुंबईतील धक्कादायक प्रकार! चुकून अंगावर शिंकला, संतापून अल्पवयीन मुलाच्या चेहऱ्यावर सॅनिटायझर टाकून पेटवून दिलं)

मिळालेल्या माहितीनुसार, भादवण गावातील रहिवासी आशाताई मारुती खुळे यांचा खून करण्यात आला. त्या विधवा होत्या. योगेश पांडुरंग पाटील असं या घटनेतील आरोपीचे नाव आहे. गुरुवारी योगेश आणि आशाताई शेतात काम करत होते. त्यावेळी योगेशने त्यांच्याशी जबरदस्ती करत शरिर संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आशाताई यांनी विरोध केला. पोलिसांत तक्रार करेन अशी धमकी दिली.  याच गोष्टीचा राग भरत योगेशने आशाताई यांचा गळा आवळला त्यांना श्वास घेण्यास त्रास झाला. दरम्यान त्याचा मृत्यू झाला.  पुरावा नष्ट करण्यासाठी  शेतात उसाच्या फडात त्यांचा मृतदेह ओढत नेऊन योगेश यांनी उसंच पहाड पेटवून दिला.

आगीची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांना मदतीचा हात म्हणून आरोपी योगेश पुढे आला आणि महिलेचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर पोलिस दलातील राहत्या गावातील संभाजी यांनी शेतातील परिसरातील सीसीटीव्ही तपासले आणि योगेश यांचा भांड फुटलं. या घटनेनंतर गावात मोठी खळबळ उडाली. योगेश हा विवाहीत असून त्याला दोन मुली आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.

(The above story first appeared on LatestLY on Dec 30, 2023 09:38 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).