Kolhapur: काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन, उपचारादरम्यान मालवली प्राणज्योत

पाठिमागील काही दिवसांपासून ते प्रकृतीअस्वास्थ्याने त्रस्त होते. त्यांच्यावर हैदराबाद (Hyderabad) येथील एका रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास (Congress MLA Chandrakant Jadhav Passes Away) घेतला.

Chandrakant Jadhav | (Photo Credits: Facebook)

काँग्रेस (Kolhapur) पक्षाचे कोल्हापूर उत्तर येथील आमदार चंद्रकांत जाधव (Chandrakant Jadhav) यांचे निधन झाले आहे. पाठिमागील काही दिवसांपासून ते प्रकृतीअस्वास्थ्याने त्रस्त होते. त्यांच्यावर हैदराबाद (Hyderabad) येथील एका रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास (Congress MLA Chandrakant Jadhav Passes Away) घेतला. चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे कोल्हापूर येथील एक फुटबॉल प्रेमी आमदार, उमदा नेता हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्यांचे पार्थिव दुपारी एक वाजेपर्यंत हैदराबाद येथून कोल्हापूरमध्ये आणण्यात येणार आहे.

चंद्रकांत जाधव हे कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधित्व विधानसभेवर करत होते. विधानसभा निवडणूक 2019 मध्ये प्रथमच ते आमदार म्हणून निवडून आले होते. शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांचा पराभव करत ते निवडूण आले होते. सलग दोन वेळा आमदार म्हणून निवडून येणाऱ्या राजेश क्षीरसागर यांचा पराभव केल्याने त्यांच्या विजयाची कोल्हापूरभर चर्चा होती. अत्यंत मनमिळवू आणि तरुणाईमध्ये प्रसिद्ध असलेला आमदार अशी त्यांची ओळख होती. राजकारणासोबतच औद्योगिक विश्वातही त्यांची उठबस होती. (हेही वाचा, Maharashtra Vidhan Parishad Elections: कोल्हापूर च्या जागेवर सतेज पाटील यांची बिनविरोध निवड; अमल महाडिक यांनी अर्ज घेतला मागे)

आमदार जाधव यांना दोन वेळा कोरोना व्हायरस संसर्ग झाला होता. त्यावळी उपचार घेऊन ते ठणठणीत बरे झाले होते. तसेच, ते पुन्हा एकदा सक्रीयही झाले होते. मात्र, पाठीमागील काही दिवसांनी त्यांना पुन्हा त्रास जाणवू लागला. त्यानंतर त्यांना हैदराबाद येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र,उपचारादरम्यान त्यांनी त्यांचे निधन झाले.