कोल्हापूर येथे एसटी महामंडळाच्या बसचा भीषण अपघात, दुर्घटनेत 32 प्रवासी जखमी

कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर एसटी महामंडळाच्या बसचा भीषण अपघात झाला आहे.

Image used for representational purpose | (Photo Credits: ANI)

कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर एसटी महामंडळाच्या बसचा भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत 32 प्रवासी जखमी झाले असून नजीकच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.

शिरगाव येथे एसटी महामंडळाची बस आजरा येथून निघाली. मात्र काही अंतर पुढे गेल्यावर बसच्या समोर अचानक एक मोटरसायकल आली. मात्र मोटरसायकला वाचवण्याचा नादात बसचे स्टेअरिंग जाम झाले. त्यामुळे बस रस्त्याच्या कडेला असणाऱ्या कंटेनरला धडकली. या दुर्घटनेत 32 प्रवासी जखमी झाल्याचे सांगितले जात आहे.

(अकोला: राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, कंटेनरने दुचाकीस्वाराला चिरडले)

तर जखमी झालेल्या रुग्णांना उपचारासाठी तातडीने दाखल करण्यात आले. तसेच जखमी झालेल्या प्रवाशांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. मात्र या अपघातात कोणताही जीवतहानी झाली नसल्याचे सांगितले जात आहे.