Sanjay Raut Vs Kirit Somaiya: संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांना केलेल्या आव्हानाला पहा त्यांनी दिलेलं प्रत्युत्तर!
आपण ठाकरे कुटुंब शिवसेनेवर कोविड घोटाळ्याचे आरोप केल्याने ते घाबरल्याचं म्हणत सारे आरोप किरीट सौमय्याअंनी देखील फेटाळले आहेत.
महाराष्ट्रामध्ये भाजपा विरूद्ध शिवसेना असलेला वाद आता संजय राऊत (Sanjay Raut) विरूद्ध किरीट सौमय्या (Kirit Somaiya) असा अजून आक्रमक झाला आहे. काल (15 फेब्रुवारी) शिवसेना भवनामध्ये शक्तिप्रदर्शन करत संजय राऊतांनी एक पत्रकार परिषद घेत सौमय्यांवर हल्लाबोल केला. त्यांच्यावर गंभीर आरोप करत ठाकरे कुटुंबाचे अलिबाग मध्ये 19 बंगले असल्याचा दावा खोटा ठरला तर किरीट सौमय्यांना जोड्याने मारा अशा शब्दांत त्यांनी आव्हान दिले होते. नक्की वाचा: Sanjay Raut: 'बाप बेटे जेल मधे जाणार, कोठडीचे sanitization सुरू आहे', संजय राऊत यांचा इशारा .
आज संजय राऊतांच्या आव्हानाचा समाचार घेत किरीट सौमय्यांनी सारे आरोप फेटाळत मुलगा नील सौमय्याची खुशाल चौकशी करा म्हणत प्रतिआव्हान दिले आहे. त्यांनी आपण ठाकरे कुटुंब शिवसेनेवर कोविड घोटाळ्याचे आरोप केल्याने ते घाबरल्याचं म्हटलं आहे. तर अलिबाग मधील ठाकरे कुटुंबाच्या 19 बंगल्यांविषयी बोलताना त्यांनी 'जर बंगले नाहीत तर मग मनिषा वायकर आणि रश्मी ठाकरे यांनी १ एप्रिल ते २०१३ ते ३१ मार्च २०२१ पर्यंतचा १९ बंगल्याचा कर कसा भरला? असा प्रश्न विचारत त्याच्या पावत्या सादर केल्या आहे. दरम्यान उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर ती घरं चोरीला गेली का? याची तक्रारही आपण केली आहे. रश्मी उद्धव ठाकरे यांनी आणि मनिषा रवींद्र वायकर यांनी घोस्ट बंगलो दाखवले. घर नसताना ते कर भरत होते असेही म्हटलं आहे.
रश्मी ठाकरे यांच्या नावावर असलेली घरं वनखात्याच्या जमीनीवर
आहेत. अन्वय नाईक आणि उद्धव ठाकरे यांचा संबंध मी बाहेर आणला. 2013 ला जागा घेतली, त्यावेळी एमओयू झाला उद्धव ठाकरे सरकारच्या काळात ही माहिती मिळवली असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. रश्मी ठाकरे यांनी काही वर्षाचा प्रॉपर्टी टॅक्स भरला आहे, आता राऊत तुम्ही जोड्याने कुणाला मारणार ? असा सवालही त्यांनी विचारला आहे.
दरम्यान संजय राऊतांनी पीएमसी बॅंक घोटाळ्याचाही काल विषय काढला होता. त्या बॅंक घोटाळ्यात संबंध नसल्याचा, नील किरीट सोमय्या यांची ‘निकॉन इन्फ्रा कन्सट्रक्शन’ ही कंपनी असून वसईतील गोखिवरे येथे मोठा प्रकल्प राबवत असून त्यांचाही पीएमसी बँक घोटाळय़ातील राकेश वाधवानशी संबंध असल्याचा राऊतांच्या आरोपालाही त्यांनी फेटाळलं आहे.