Kalyan Dombivali Mahanagarpalika Recruitment 2020: कल्याण डोंबिवली महानगरपालिका मध्ये 514 जागांसाठी भरती जाहीर; जाणून अर्ज करण्याची पद्धत
यात वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी (सामान्य), आयुष वैद्यकीय अधिकारी स्टाफ नर्स, ईसीजी तंत्रज्ञ, वार्ड बॉय आदी पदे भरण्यात येणार आहेत. या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे, अशी जाहीरात महापालिकेकडून देण्यात आली आहे. वरील पदासाठी मुलाखतीची तारीख 11 व 12 जून 2020 असणार आहे.
Kalyan Dombivali Mahanagarpalika Recruitment 2020 : कल्याण डोंबिवली महानगरपालिके (Kalyan Domvibali Municipal Corporation) मध्ये 514 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यात वैद्यकीय अधिकारी (Medical Officer), वैद्यकीय अधिकारी (सामान्य), आयुष वैद्यकीय अधिकारी स्टाफ नर्स (Ayush Medical Officer), ईसीजी तंत्रज्ञ (ECG Technician), वार्ड बॉय (Ward Boy) आदी पदे भरण्यात येणार आहेत.
या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे, अशी जाहीरात महापालिकेकडून देण्यात आली आहे. वरील पदासाठी मुलाखतीची तारीख 11 व 12 जून 2020 असणार आहे. (हेही वाचा - मुंबईतील COVID19 च्या रुग्णांसाठी बेड्सची सोय करण्यासाठी महापालिकेकडून वॉर्ड वॉर रुमची स्थापना)
पदाचे नाव - वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी (सामान्य), आयुष वैद्यकीय अधिकारी स्टाफ नर्स, ईसीजी तंत्रज्ञ, वार्ड बॉय
पद संख्या - 514 जागा
शैक्षणिक पात्रता - शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण - कल्याण
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – आयुक्त कार्यालय, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, शंकरराव चौक, कल्याण (प)
मुलाखतीची तारीख - 11 व 12 जून 2020
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या रुग्णांलयीन सेवेसाठी वाढीव मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्यामुळे वरील पदांची तात्पुरत्या / अस्थायी स्वरुपात कंत्राट पद्धतीने नेमणूक करण्यात येणार आहे. यासाठी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.