कडकनाथ कोंबडी घोटाळ्याचा पहिला बळी; पन्हाळा तालुक्यातील शेतकऱ्याची आत्महत्या

प्रमोद जमदाडे, असं या तरुणाचे नाव आहे. प्रमोद यांनी कडकनाथ कोंबडी पालनासाठी अडीच लाख रुपयांची गुंतवणूक केली होती.

Kadaknath Scam (PC - You Tube)

कडकनाथ घोटाळ्याचा (Kadaknath Scam) पहिला बळी कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात गेला आहे. प्रमोद जमदाडे (Pramod Jamdade) असं या तरुणाचे नाव आहे. प्रमोद यांनी कडकनाथ कोंबडी पालनासाठी अडीच लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. प्रमोद जमदाडे याने रयत ऍग्रोच्या गुंतवणूकदारांना न्याय मिळण्यासाठी उभ्या केलेल्या लढ्यामध्ये सहभाग नोंदवला होता. प्रमोद जमदाडे यांना रयत ऍग्रो संस्थेकडे अडीच लाख रुपयांची गुंतवणूक केल्याने नैराश आले होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्येचा पर्याय निवडला. प्रमोद यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

रयत ऍग्रो संस्थेचे प्रमुख सागर सदाभाऊ यांची प्रकरणी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी गुंतवणूकदारांनी केली आहे. या प्ररकरणामुळे संपूर्ण पन्हाळा तालुक्यात खळबळ उडाली आहे. कडकनाथ कोंबडी प्रकल्पामध्ये गुंतवणूक केल्यास मोठा लाभ मिळेल, अशी जाहिरात करण्यात आली होती. त्यामुळे प्रमोद जमदाडे यांनी कर्ज काढून रयत संस्थेमध्ये गुंतवणूक केली होती. परंतु, कर्जाचे हप्ते थकल्यामुळे त्यांनी आत्महत्येचा पर्याय निवडला.  (वाचा - शिवरायांच्या जागी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा असलेला वादग्रस्त व्हिडिओ हटवण्याची महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची YouTube मागणी)

कडकनाथ प्रकल्पात फसवणूक केल्याने प्रमोद जमदाडे यांनी 18 जानेवारी रोजी विषारी औषध प्राशन केले होते. त्यानंतर त्यांना कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या घटनेनंतर कडकनाथ प्रकल्पात गुंतवणूक केलेल्या शेतकऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. दरम्यान, या गुंतवणुकदारांकडून कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे सुपुत्र सागर यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली जात आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif