Nawab Malik Joins Ajit Pawar's Group: शरद पवारांना मोठा धक्का! माजी मंत्री नवाब मलिक अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटात सामील

त्यांनी विधानभवन संकुलातील अजित पवार गटनेत्याच्या कार्यालयाला भेट दिली. मलिक यांनी तेथील अनेक आमदार आणि इतर अधिकार्‍यांशी संवाद साधला.

Nawab Malik, Ajit Pawar (Photo Credit- Facebook)

Nawab Malik Joins Ajit Pawar's Group: कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात (Money Laundering Case) 18 महिने तुरुंगवास भोगलेले महाराष्ट्राचे माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस गटात (NCP) सामील झाले. आज संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष नवाब मलिक यांच्या निर्णयाकडे लागले होते. 'साहेब की दादा' या कोड्याचं उत्तर अखेर जनतेला मिळालं आहे. 64 वर्षीय मलिक यांनी फेब्रुवारी 2022 ते ऑगस्ट 2023 पर्यंत तुरुंगात वेळ घालवला. सध्या ते वैद्यकीय जामिनावर बाहेर आहेत.

तत्पूर्वी, अजित पवार यांनी पत्रकारांना सांगितले की, 'आपण नवाब मलिक यांना फोन करून ‘वेलकम टू नागपूर’ म्हटले आहे. नवाब मलिक हे एक ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे ते अशा विषयांवर स्वतःहून निर्णय घेण्यास सक्षम आहेत.' तथापी, महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी नवाब मलिक गुरुवारी सकाळी नागपुरात गेले. त्यांनी विधानभवन संकुलातील अजित पवार गटनेत्याच्या कार्यालयाला भेट दिली. मलिक यांनी तेथील अनेक आमदार आणि इतर अधिकार्‍यांशी संवाद साधला. विधानसभेचे अधिवेशन सुरू झाल्यानंतर लगेचच मलिक विधानसभेत सत्ताधारी पक्षाच्या मागच्या रांगेत बसलेले दिसले. (हेही वाचा -Nawab Malik News: साहेब की दादा? नवाब मलिक यांची भूमिका स्पष्ट झाल्याची चर्चा; सभागृहात सत्ताधारी बाजूचे आसन ग्रहण)

दरम्यान, मुंबई आणि नागपूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) ज्येष्ठ नेत्यांनी नवाब मलिक यांच्या संदर्भातील घडामोडीवर भाष्य करण्यास नकार दिला. 'ते (मलिक) ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांनी सर्व बाबींचा विचार करूनच निर्णय घेतला असेल,' असं राष्ट्रवादीच्या एका नेत्याने माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे. (हेही वाचा - Maharashtra Assembly Winter Session 2023: राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास आजपासून सुरुवात)

ऑगस्टमध्ये त्यांची जामिनावर सुटका झाल्यापासून शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटांकडून मलिक यांना आकर्षित केले जात होते. परंतु, मलिक यांनी कोणत्या गटात सामील व्हायचे याबाबत कोणतीही माहिती दिली नव्हती. नवाब मलिक अखेर शरद पवार यांना साथ देणार की, दादांचा हात धरणार, याकडे सर्वांच लक्ष लागलं होतं. मात्र, अखेर आज महाराष्ट्रातील तमाम जनतेला मलिक यांचा निर्णय समजला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif