जितेंद्र आव्हाडांचा रंजन गोगोई यांच्या राज्यसभेवरील नियुक्तीला विरोध! ट्वीटर वर व्यक्त केली नाराजी
त्यानंतर आता देशभरातून या नियुक्तीबाबत टीकेचा सूर उमटत आहे. खासदार असदुद्दीन ओवेसी पाठोपाठ आता महाराष्ट्रात कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील ट्वीटरच्या माध्यमातून रंजन गोगाई यांच्या राज्यसभेवरील नियुक्तीबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
भारताचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगाई यांची काल (16 मार्च) राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर आता देशभरातून या नियुक्तीबाबत टीकेचा सूर उमटत आहे. खासदार असदुद्दीन ओवेसी पाठोपाठ आता महाराष्ट्रात कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील ट्वीटरच्या माध्यमातून रंजन गोगाई यांच्या राज्यसभेवरील नियुक्तीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. ' राज्यसभेत जायचं असेल तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बना! आणि सत्ताधारी खुश होतील असे निर्णय द्या. बाबासाहेब बघता आहात ना ...वरिष्ठ सरकारी अधीकारी आणि न्यायाधीश ह्यांना निवृत्ती नंतर 10 वर्ष राजकारण प्रवेश बंदी हि काळाची गरज आहे तरच लोकशाही वाचेल.' असं ट्वीट करत जितेंद्र आव्हाड यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान भारताच्या इतिहासातील वादग्रस्त अयोद्धा खटल्याचा अंतिम निकाल रंजन गोगाई यांनी काही महिन्यांपूर्वी ते सरन्यायाधीश असताना दिला. त्यानंतर ते निवृत्त झाले. आणि आता त्यांची नियुक्ती राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केल्याने काहींनी नाराजी व्यक्त केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांची राज्यसभेवर वर्णी; राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिली उमेदवारी.
जितेंद्र आव्हाड यांचे ट्वीट
दरम्यान रंजन गोगाई यांचा जन्म 18 नोव्हेंबर 1954 ला झाला. ते मूळचे आसामी असून त्यांचे वडील कॉंग्रेस पक्षाचे नेते होते.रंजन गोगाई यांची गुवाहटी उच्च न्यायलयात वकिलीची सुरूवात 1978 मध्ये झाली. त्यानंतर 2001 साली ते गुवाहटी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाले. पुढे त्यांनी पंजाब आणि हरियाणा न्यायालयातही काम केले आहे.