Petrol, Diesel Price Hike: काढली आठवण.. दाखवले पोस्टर, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा पंतप्रधान मोदी, भाजप प्रणित केंद्र सरकारला टोला

जनतेला दिलासा दिला जाईल. अच्छे दिन येथील. सरकारी नोकऱ्या आणि रोजगारही वाढवला जाईल. त्यासोबतच पाकिस्तानला धडा शिकवला जाईल. देशातील अनेक शहरं ही स्मार्ट सिटी केली जातील यांसह शेतकऱ्यांचे कृषीउत्पन्न दुप्पट केले जाईल यांसह अनेक अश्वासने भाजपने निवडणूक काळत जनतेला दिली होती.

BJP Poster | (Photo Credit: Twitter)

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप (BJP) सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. ही टीका करताना आव्हाड यांनी भाजपचे निवडणुक काळातील पोस्टर दाखवले आहे. ज्यावर 'बहोत हुई जनता पर पेट्रोल-डिझेल की मार... अब की बार मोदी सरकार' या ओळी पंतप्रधान मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या प्रतिमेसहीत वापरल्या आहेत. त्याचा वापर करत आव्हाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून टीका केली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ''आज पेट्रोल व डिझेलचे भाव पुन्हा वाढवले. पेट्रोल 17 पैसे ते 20 पैसे तर डिझेलच्या दरात 47 ते 55 पैसे अशी वाढ झाली आहे. महाराष्ट्रात पेट्रोलचा दर हा 86.85 रुपये तर डिझेलचा दर 77.49 रुपये, असे म्हटले आहे. तसेच ही होर्डींग्स पाहिली असतील पेट्रोल पंपा वरती, विसरला असाल तर लक्षात आणुन द्यावे म्हंटल'' असेही म्हटले आहे. (हेही वाचा, शरद पोंक्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या व्यासपिठावर, जयंत पाटील यांनी दिले स्पष्टीकरण; तर्कवितर्कांवर पडदा टाकण्याच प्रयत्न)

पेट्रोल-डिझेल दर कमी केले जातील. जनतेला दिलासा दिला जाईल. अच्छे दिन येथील. सरकारी नोकऱ्या आणि रोजगारही वाढवला जाईल. त्यासोबतच पाकिस्तानला धडा शिकवला जाईल. देशातील अनेक शहरं ही स्मार्ट सिटी केली जातील यांसह शेतकऱ्यांचे कृषीउत्पन्न दुप्पट केले जाईल यांसह अनेक अश्वासने भाजपने निवडणूक काळत जनतेला दिली होती. मात्र, त्यातील बहुतांश अश्वासनं पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारला अद्याप यश आले नाही. त्यामुळे केंद्र सरकारवर टीका होऊ लागली आहे. हाच धागा पकडत जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर टीका केली आहे.