कुठून हे नग मिळतात?, जितेंद्र आव्हाडांची उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्यांवर टिका
यावर राष्ट्रवादी काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सडकून टिका केली आहे.
देशावर कोरोनाचे संकट घोंगावत असताना दुसरीकडे मात्र राजकारण देखील तापत चाललं आहे. राजकीय व्यक्ती एकमेकांवर टिका करण्याची एकही संधी सोडत नाही. कधी मिडियाद्वारे तर कधी सोशल मिडियाद्वारे, एकमेकांवर कुरघोडी सुरुच असते. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांच्या यादीत उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते त्रिवेंद्र सिंह रावत (Trivendra Singh Rawat) यांची भर पडली आहे. एकीकडे लोकांचे मृत्यू होत असताना आणि आरोग्य सुविधांचा तुटवडा निर्माण झालेला असताना त्रिवेंद्र सिंह यांनी कोरोना विषाणू हा सुद्धा एक जीव असून त्यालाही जगण्याचा अधिकार असल्याचं म्हटलं आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सडकून टिका केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या वक्तव्यावरुन संताप व्यक्त केला आहे. "हे उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र रावत. काय तारे तोडतायत ऐका. कुठून हे नग मिळतात?," अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी ट्विटरला त्रिवेंद्र रावत यांचा व्हिडीओही शेअर केला आहे.हेदेखील वाचा- बाबो! चक्क दारू पाजून बरे केले Covid-19 चे 40-50 रुग्ण; अहमदनगरच्या डॉक्टरांचा दावा
काय म्हणाले होते त्रिवेंद्र सिंह रावत?
त्रिवेंद्र सिंह यांनी गुरुवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना करोना विषाणू हा सुद्धा एक जीव असून त्यालाही जगण्याचा अधिकार आहे, असं मत व्यक्त केलं आहे. सोशल नेटवर्किंगवर त्रिवेंद्र सिंह यांचं हे वक्तव्य सोशल नेटवर्किंगवर तुफान व्हायरल झालं आहे. म्युटेड करोना विषाणूसंदर्भात बोलताना त्रिवेंद्र सिंह यांनी करोना हा सुद्धा विषाणू असून त्यालाही जगण्याचा अधिकार असल्याचं म्हटलं.